Donald Trump Food Truck Escape: इराणची दहशत... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा तुर्कस्तानमध्ये फूड ट्रकमधून लपून प्रवास

Donald Trump Food Truck Escape
Donald Trump Food Truck Escapepudhari
Published on
Updated on

Donald Trump Food Truck Escape: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दर दोन दिवसांनी इराणला तुम्हाला उद्ध्वस्त करू अशी धमकी देत असतात. तसेच इराणची लष्करी ताकद संपुष्टात आल्याचा दावा देखील ते वारंवार करत असतात. मात्र नुकतेच इराणकडून असलेला धोका डोनाल्ड ट्रम्प यांनी किती गांभिऱ्यांने घेतला होता हे दिसून येते. वॉशिंग्टन पोस्टने सोमवारी एक वृत्त दिलं.

Donald Trump Food Truck Escape
Donald Trump | मला करार हवा आहे, लोकांना मारायचे नाही : डोनाल्ड ट्रम्प

या वृत्तात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कीस्तानमधून बाहेर पडण्यासाठी फूड ट्रकचा वापर केला होता. तसेच त्यांनी एअर फोर्स वन ऐवजी लष्कराच्या जेटने प्रवास केला होता असा दावा करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो समीटमध्ये जाण्यासाठी कतारने डोनेट केलेल्या नव्या एअर फोर्स वनच्या विमानाने प्रवास केला होता. मात्र त्यांनी कतारमधून बाहेर पडताना जुन्या एअर फोर्स वनचा वापर केला होता. त्यामुळं सुरक्षेबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते.

Donald Trump Food Truck Escape
Donald Trump | ट्रम्प यांचे युद्धाधिकार कायम; सिनेटमध्ये फेटाळला अधिकारांवर अंकुश आणण्याचा प्रस्ताव

नाटोच्या समीटसाठीची ट्रीप ही डोनाल्ड ट्रम्प यांची कतारने गिफ्ट केलेल्या विमानातून केली जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप होती. मात्र इराणसोबतच्या तणावपूर्ण वातावरणात इराणच्या शेजारील देशात जाताना मोठा धोका होता.

त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांनी जुने एअर फोर्स वनचे विमान वापरले. मात्र त्यांनी गुप्तरित्या एअरपोर्ट कॅटरिंग ट्रकचा वापर करून दुसऱ्या छोट्या विमानात शिरले. त्यांनी एअर फोर्स सी ३२अ या विमानातून प्रवास केला. याबाबत युएस ऑफिशिअल्स आणि इतर लोकांना राष्ट्राध्यक्षांच्या या प्रवासाबाबत माहिती होती.

Donald Trump Food Truck Escape
Donald Trump | होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचा २० टक्‍के टोल

सी - ३२ अ हे विमान तुर्कीस्तानमधून ब्रिटनमध्ये रात्री १०.२० मिनिटांनी लँड झालं. त्याचबरोबर जुनं एअर फोर्स वन देखील लँड झालं. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर त्यांनी जुन्या बेबी ब्लू एअर फोर्स वनचा वापर केला होता असं सांगितलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news