.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी ( दि.१५) पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. माजी राष्ट्रपती या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. २० वर्षीय हल्लेखोर थॉमस क्रुक्स याला सुरक्षा दलाने ठार केले. क्रूक्सच्या कृत्याने त्याच्या कुटुबीयांना मोठा धक्का बसला आहे. आता कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
थॉमसचे वडील मॅथ्यू क्रुक्स यांच्याशी अमेरिकेतील माध्यमांनी संपर्क साधला. एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना मॅथ्यू क्रुक्स म्हणाले की, नेमकं काय घडले याची मी माहिती घेत आहे. थॉमसने केलेले कृत्य धक्कादायक आहे. थॉमसचे चुलते मार्क क्रूक्स यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा थॉमसशी संपर्क नव्हता. मी लहानपणापासून तो आम्हाला कधीच त्रास देऊ इच्छित नव्हता. ही घटना आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. काय बोलावे ते समजत नाही. आम्ही अजूनही हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
थॉमसचे वर्गमित्र आणि शेजाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, थॉमस हा लहानपणापासून हायस्कूलमधील एक शांत आणि अलिप्त मुलगा होता. इतर मुलांसारखी त्याची हिंसक प्रवृत्ती नव्हती. तो लाजाळू आणि नेहमी आपल्याच विचारात मग्न असणारा एक शांत मुलगा होता. राजकारणाकडे त्यांचा कल नव्हता. तो नेहमी एकटाच राहत असेल. इतर विद्यार्थी नेहमी त्याच्यावर दादागिरीही करायचे.
थॉमसच्या एका वर्गमित्राने सांगितले की, ट्रम्प यांच्यावर थॉमसने गोळीबार केला ही बातमी ऐकून मला धक्काच बसला. तो असे काहीतरी केरेल यावर माझा विश्वासच बसत नाही. तो एक अतिशय शांत मुलगा होता.