

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा सदस्यीय गटात सामील होऊ पाहणार्या राष्ट्रांवर अमेरिका आयात शुल्क लावेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसमध्ये अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष झेवियर मिलेई यांच्यासोबत द्विपक्षीय भोजनावेळी त्यांनी हे विधान केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, ब्रिक्स हा डॉलरवरील हल्ला होता आणि जे देश डॉलरमध्ये व्यवहार करू इच्छितात, त्यांना तसे न करणार्या देशांपेक्षा स्पष्ट फायदा मिळतो, यावर त्यांनी जोर दिला. दहा सदस्यीय गटात सामील होऊ पाहणार्या राष्ट्रांवर अमेरिका आयात शुल्क (टॅरिफ) लावेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. व्हाईट हाऊसमध्ये अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष झेवियर मिलेई यांच्यासोबत द्विपक्षीय भोजनावेळी ट्रम्प यांनी हे विधान केले.
व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकन चलनाची जागा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी आयात शुल्क लावण्याची धमकी दिल्यानंतर लगेचच ब्रिक्सचे सदस्य देश या गटातून बाहेर पडत आहेत, असे ते म्हणाले.