Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बचावले; तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

मोंटाना येथे रॅलीसाठी जात असताना घटना
Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानात शनिवारी बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानात शनिवारी बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यामुळे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले ट्रम्प पुन्हा थोडक्यात बचावले. मोंटाना येथे रॅलीसाठी जात असताना ही घटना घडली. गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता, त्यावेळीही ते थोडक्यात बचावले होते.

Donald Trump
Bangladesh Crisis | बांगला देशातील हिंदूच्या सुरक्षेसाठी समिती

विमानतळाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोझमन मोंटाना येथे जाणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानामध्ये तांत्रिक समस्या होती. त्यामुळे रॉकी पर्वताच्या पलीकडे असलेल्या बिलिंग्स विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. बिलिंग्स लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी जेनी मोकेल यांनी सांगितले की, 'ट्रम्प प्रायव्हेट जेट विमानाने बोझेमनला जात होते.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news