जगभरात ‘वायकिंग बेबी क्रेझ’! 'या' देशातील शुक्राणूंना प्रचंड मागणी, मात्र एका घटनेने वाढली चिंता..

‘वायकिंग बेबी’च्या हव्यासापोटी जगभरातील महिलांची शुक्राणू खरेदीची शर्यत; एका देशातील धोकादायक ट्रेंडमुळे वाढली चिंता
denmark sperm donation industry
जगभरात ‘वायकिंग बेबी क्रेझ’! 'या' देशातील शुक्राणूंना प्रचंड मागणी, मात्र एका घटनेने वाढली चिंता..File Photo
Published on
Updated on

denmark sperm donation industry dark side why everybody wants viking baby

कोपेनहेगन : पुढारी ऑनलाईन

जगातील सर्वाधिक आनंदी आणि सुंदर देशांपैकी एक मानला जाणारा डेन्मार्क सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. डेन्मार्कमध्ये जन्माला येणाऱ्या दर 100 मुलांपैकी एक मूल स्पर्म डोनेशनद्वारे जन्माला येते. जगभरात शुक्राणूंची निर्यात करणारा 60 लाख लोकसंख्या असलेला हा स्कँडिनेव्हियन देश एक पॉवरहाऊस मानला जातो. मात्र अलीकडच्या काळात या उद्योगावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या उद्योगाचा काळा चेहरा हळूहळू समोर येत आहे.

denmark sperm donation industry
रेल्वेच्या रुळांना गंज का लागत नाही? जाणून घ्या त्यामागचे रहस्य

डेन्मार्कमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आरहसच्या मध्यभागी असलेल्या लाल विटांच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर क्रायोस ही संस्था कार्यरत आहे. याच ठिकाणी शुक्राणू दान (स्पर्म डोनेशन) केले जाते. ही संस्था जगातील सर्वात मोठी शुक्राणू बँक म्हणून ओळखली जाते.

वाइकिंग स्पर्म’ची मागणी

डेन्मार्क अनेक देशांना स्पर्म पुरवतो. जगभरातील अनेक महिलांना गोरे, निळ्या डोळ्यांचे डोनर हवे असतात. याचाच फायदा घेत डेन्मार्कची स्पर्म इंडस्ट्री जगभरात तथाकथित ‘वाइकिंग स्पर्म’ निर्यात करते, ज्यातून सुंदर आणि निरोगी मुले (वाइकिंग बेबी) जन्माला येतील असा दावा केला जातो.

denmark sperm donation industry
शेतकऱ्यानी चक्क गाढवांना खाऊ घातले गुलाबजामून; काय आहे कारण?

मात्र या उद्योगाचा काळा पैलू तेव्हा उघड झाला, जेव्हा एकाच डोनरकडून 197 मुलांचा जन्म झाला आणि त्या डोनरमध्ये कॅन्सरशी संबंधित घातक जनुकीय म्युटेशन आढळून आले.

अहवालातून कॅन्सरचा खुलासा

वायनेटच्या माहितीनुसार, एका अलीकडील तपास अहवालात डेन्मार्कच्या स्पर्म इंडस्ट्रीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अहवालानुसार, एका डोनरने 14 देशांतील 67 क्लिनिकांच्या माध्यमातून किमान 197 मुलांना जन्म दिला.

या सर्व मुलांमध्ये एक समान जनुकीय दोष (म्युटेशन) आढळला असून, तो एका प्राणघातक कॅन्सरशी संबंधित आहे. यापैकी काही मुलांचा मृत्यूही झाला आहे.

संबंधित डोनरने 2005 साली स्पर्म डोनेशन सुरू केले आणि तब्बल 17 वर्षे ते सुरू ठेवले. ज्या मुलांना हा जनुकीय दोष मिळाला आहे, त्यांना भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका असून, त्यांची सतत वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. या घटनेमुळे वेगाने वाढणाऱ्या या उद्योगावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत, विशेषतः स्पर्म डोनेशनचे नियमन कसे केले जाते, याबाबत.

युरोप आणि डेन्मार्कची भूमिका

युरोपमधील स्पर्म डोनेशन बाजाराची किंमत सध्या सुमारे 1.3 अब्ज युरो असून, 2033 पर्यंत ती 2.3 अब्ज युरोपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या बाजारात डेन्मार्क हा जगातील सर्वात मोठा स्पर्म निर्यातदार देश आहे.

डेन्मार्कमधील क्रायोस इंटरनॅशनल ही संस्था जगातील सर्वात मोठी स्पर्म बँक आहे. येथून 100 हून अधिक देशांमध्ये स्पर्म निर्यात केला जातो. स्पर्मची एक छोटी बाटली (सुमारे अर्धा मिलीलीटर) याची किंमत 100 ते 1,000 युरो दरम्यान असते.

डेनिश डोनरचा प्रभाव

नेदरलँड्स आणि बेल्जियमसारख्या देशांमध्ये स्पर्म डोनेशनद्वारे जन्माला येणाऱ्या 60% मुलांचे जैविक वडील डेनिश असतात. डेन्मार्कमधील स्पर्म बँका महिलांना डोनरची सविस्तर प्रोफाइल देतात, ज्यात त्यांचे फोटो आणि पार्श्वभूमीची माहिती असते.

यासाठी येथील स्पर्मची मोठी मागणी

गोरे, निळे डोळे आणि मजबूत जनुकांचा दावा हा जगभरात मोठा आकर्षणाचा मुद्दा ठरतो.

कडक निगराणीची मागणी

कॅन्सरशी संबंधित हा प्रकार समोर आल्यानंतर, युरोपियन युनियनचे अधिकारी स्पर्म एक्सपोर्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नोंदणी प्रणाली (International Registry) सुरू करण्याची मागणी करत आहेत.

दुसरीकडे, डेन्मार्कच्या स्पर्म इंडस्ट्रीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाइकिंग स्पर्मच्या वाढत्या मागणीला पूर्तता करण्याच्या घाईत नियामक त्रुटी उघड झाल्या आहेत. या प्रकरणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले असून, विशेषतः युरोप या विषयाकडे गांभीर्याने पाहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news