म्यानमारमध्ये मोखा चक्रीवादळात 6 ठार

म्यानमारमध्ये मोखा चक्रीवादळात 6 ठार

यंगून; वृत्तसंस्था : मोखा चक्रीवादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत म्यानमारमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरांची छते उडून गेली. काही भागांत पूरस्थितीही निर्माण झाली आहे. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. दरम्यान, बांगलादेशातील सर्वांत मोठ्या निर्वासित छावणीतील 3 लाख रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठी प्राणहानी टळली. म्यानमारमधील सिटवे, क्यूकप्यू आणि ग्वा टाऊनशिपमध्ये मोठे नुकसान झाले. शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब, मोबाईल फोन टॉवरही कोसळले आहेत. सिटवे बंदरात बोटी उलटल्या आणि लॅम्पपोस्टही उखडले आहेत.

बांगलादेशातील धोका कमी

बांगलादेशमधील कॉक्स मार्केटला धडकण्यापूर्वी, वादळ पूर्वेकडे वळल्याने येथील धोका बर्‍याच अंशी कमी झाला. कॉक्स बाजार या जगातील सर्वात मोठ्या निर्वासित छावणीतील 1,300 हून अधिक तंबू नष्ट झाले. तत्पूर्वीच अधिकार्‍यांनी छावणीतील सुमारे 3 लाख रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षित ठिकाणी हलवलेले असल्याने प्राणहानी टळली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news