Microsoft Down | अब्जावधींच्या भरपाईपोटी १० डॉलरची कॉफी; CrowdStrikeवर नेटकरी संतप्त

८५ लाख काँप्युटरना बसला होता फटका!
crowdstrike faces criticism offering 10 voucher apology
CrowdStrikeने या नुकसानीबद्दल दिलगिरी व्यक्त करत १० डॉलरची कॉफी देऊ केली आहेFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याने जगभरातील कंपन्यांना अब्जावधींचे नुकसान सोसावे लागले आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवा खंडित होण्यासाठी जबाबदार होते CrowdStrike हा सिक्युरिटी प्लॅटफॉर्म. पण CrowdStrikeने या नुकसानीबद्दल दिलगिरी व्यक्त करत १० डॉलरची कॉफी देऊ केली आहे.

CrowdStrike ज्या कंपन्यांसोबत काम करते, त्या कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे कॉफीचे व्हाऊचर देण्यात आलेले आहेत.

CrowdStrikeने म्हटले आहे की, "आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, त्यामुळे तुमची पुढील रात्री उशिराची कॉफी किंवा स्नॅक्सची जबाबदारी आमच्यावर राहील."

CrowdStrikeची ही 'कॉफी रुचली नाही!

पण नेटिझन्सना मात्र CrowdStrikeची ही 'कॉफी' रुचलेली दिसत नाही. एका रेडिट युजरने हा प्रकार म्हणजे, "निव्वळ 'जोकर'पणा आहे असे म्हटले आहे. "जेव्हा मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्या, तेव्हा मला माझ्या कारसह पुलावरून उडी घेण्याची इच्छा झाली होती, आता हे लोक कॉफी देत आहेत," असे या युजरने म्हटले आहे.

तर एका लिंक्डइन युजरने म्हटले आहे, "१९ जूनला हा प्रकार घडला. त्यानंतर हजारो मनुष्य तास आणि काही अब्ज रुपयांचे नुकसान झाले. आता ही कंपनी कॉफीचा कप किंवा उबर इटचे व्हाऊचर देत आहे."

Microsoft Outage कशामुळे?

क्राऊडस्ट्राईकने पार्टनरना व्हाऊचर पाठवले असल्याचे म्हटले आहे. "आमच्या ज्या पार्टनर कंपन्यांनी आम्हाला या संकटातून बाहेर पडण्यास मदत केली, त्यांना आम्ही हे व्हाऊचर पाठवले आहेत," असे Crowdstrikeने म्हटले आहे.

CrowdStrike मायक्रोसॉफ्ट विंडोसाठीचे सिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे. CrowdStrikeच्या अपडेटमध्ये काही त्रुटी राहिल्याने मायक्रोसॉफ्टच्या सेवा १९ जुलैला ठप्प झाल्या होत्या. मायक्रोसॉफ्टच्या सेवा बंद पडण्याचा फटका ८५ लाख काँप्युटरना बसला होता.

crowdstrike faces criticism offering 10 voucher apology
Microsoft Windows | CrowdStrike Update - मायक्रोसॉफ्टच्या सेवा का झाल्या ठप्प? जाणून घ्या कारण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news