

Crime News Mother Pension Fraud:
मंटुआ मधील ५६ वर्षाचा एक व्यक्ती आपल्या आईचे कपडे घालून, मेकअप करून लिप्स्टिक लावून सरकारी कार्यालयात पोहचला होता. त्यानं चेहऱ्यावर फाऊंडेशनही लावलं अन् गळ्यात एक हार देखील घातला होता. तो उपनगारातील एका सरकारी कार्यालयात आपल्या आईचं ओळख पत्र नुतनीकरणासाठी हा सगळा थाट करून पोहचला होता.
विशेष म्हणजे या ५६ वर्षाच्या व्यक्तीनं आपल्या आईसारखाच हेअरकट केला होता. त्यानं चाची ४२० चित्रपटातील नानीसारखा लूक केला होता. त्यानं सरकारी कार्यालयात आपलं नाव हे मिसेस डालओग्लिओ असं सांगितंल. मात्र कर्मचाऱ्यांना शंका आली. आलेल्या महिलेमध्ये काहीतरी वेगळं असल्याचं जाणवलं. या महिलेचा आवाज जड आणि मान खूपच जाड दिसत होती.
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्वरित पोलिसांना याची सूचना दिली. त्यानंतर स्थानिक मेअरला देखील याची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांना मिसेस डालओग्लियो यांच्या फोटीची आणि त्यांच्या मुलाच्या फोटोची तुलना केल्यावर काहीतरी गडबड असल्याचं दिसलं.
आलेली व्यक्ती ही ८५ वर्षाची असल्याचं वाटत नव्हतं. त्या व्यक्तीचा आवाज देखील पुरूषी वाटत होता. शंका आल्यानंतर या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात आली त्यावेळी ही व्यक्ती मिसेस डालओग्लियो नसून तो त्यांचा ५६ वर्षाचा मुलगा असल्याचं निष्पन्न झालं.
मिळालेल्या माहितीनुसार मुलानं आपल्या आईची पेन्शन मिळावी यासाठी तिचा मृत्यू झाल्याचं तीन वर्षापासून लपवून ठेवलं होतं. डॉलओग्लिओ यांचे निधन ८२ व्या वर्षी झालं होतं. त्यानं आपल्या आईचा मृतदेह चादरमध्ये गुंडळून स्लिपिंग बॅगमध्ये भरून लपवून ठेवला होता. तो गेल्या तीन वर्षांपासून आईची पेन्शन घेत होता.
त्यानं वर्षाला ४७ हजार पाऊंड पेन्शन मिळवली होती. याचबरोबर या मुलाकडं तीन घरं आणि एक प्रॉपर्टी देखील होती. पोलिसांनी या मुलाला अटक केलं त्यानंतर ते घरात पोहचले. त्यावेळी मिसेस डालओग्लियो यांचा मृतदेह कपडे धुण्याच्या रूममध्ये ठेवण्यात आल्याचं दिसून आलं.
यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला अन् शवविच्छेदनासाठी पाठवला. मिसेस डालओग्लियो यांच्या मुलावर आता मृतदेह अवैधरित्या लपवणे आणि फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.