

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चीनच्या बीवायडी कंपनीचा 100 कोटी डॉलरचा इलेक्ट्रिक कारनिर्मितीचा प्रस्ताव सुरक्षेच्या कारणास्तव भारताने फेटाळून लावल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. सीमेवर चीनकडून कुरापती सुरू असल्यामुळे अलीकडच्या काळात चिनी प्रकल्पांवर केंद्राच्या वतीने निर्बंध लादले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फास्ट्रक्चरर्स लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी करून बीवायडी कंपनीने इलेक्ट्रिक कारनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रकल्पासाठी या कंपनीने 100 कोटी डॉलरची बोलीही लावली होती. या कंपनीचा प्रस्ताव फेटाळल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, या प्रकल्पाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या तंत्रज्ञानाबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने चिनी तंत्रज्ञान सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्राने हा प्रकल्प रद्द केला आहे.
चीन, पाकिस्तान या देशांच्या सीमांवर सातत्याने कुरापती सुरू असतात. त्यामुळे या देशांतील प्रकल्पांना परराष्ट्र मंत्रालयाची खास मंजुरी घ्यावी लागणार आहे. चिनी कंपनीचे तंत्रज्ञान सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे बीवायडी कंपनीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :