China Pakistan Relations | पाकशी मैत्री वाढवून चीनचा भारताला घेरण्‍याचा डाव!

अमेरिकन संसदीय अहवालात ‘ड्रॅगन’चा पर्दाफाश; भारतावर ‘टू-फ्रंट वॉर’चे वावटळ घोंघावत असल्‍याचा इशारा
China Pakistan Relations |
China Pakistan Relations | पाकशी मैत्री वाढवून चीनचा भारताला घेरण्‍याचा डाव!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन; वृत्तसंस्‍था : कपटी कारवायांसाठी जगभरात ओळखला जाणारा चीन दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्‍या पाकिस्तानशी मैत्री वाढवून भारताला घेरण्‍याच्‍या तयारीत असल्‍याचा पर्दाफाश अमेरिकेच्या संसदीय आयोगाने (यूएससीसी) अहवालाद्वारे दिला आहे. या दोन्‍ही देशांतील वाढत्‍या लष्‍करी सहकार्यामुळे भारतावर ‘टू-फ्रंट वॉर’ (दोन आघाड्यांवर युद्ध) होण्याचा धोका वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

या अत्यंत महत्त्वाच्‍या आणि इशारा देणार्‍या अहवालात मे २०२५ मधील भारत-पाक लष्करी संघर्षाचा विशेष उल्लेख आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्‍या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्‍मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर चीन थेट युद्धात न उतरता पाकला मोठी लष्करी व धोरणात्मक मदत करतो, भविष्यात भारताशी लढताना चीनचे पाकला समर्थन भारताच्या लष्करी तयारी व रणनीतीसमोर मोठी आव्हाने उभी करू शकताे, हे उघड झाल्‍याचे हा अहवाल सांगतो.

चीन भारतावर अंकुश ठेवण्यासाठी लष्करी, आर्थिक व सागरी दबाव निर्माण करत आहे. प्रचंड लोकसंख्या, अर्थव्यवस्था, अणुशक्ती व भौगोलिक स्थानाच्या जोरावर चीनच्या सामर्थ्याचा मुकाबला करण्‍याची ताकद भारतात आहे. भारताची २,१०० मैल लांबीची सीमा चीनला लागून आहे.

हिंदी महासागरात खेळ

हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या उपस्थितीवर अहवालात चिंता व्यक्त केली. चीन येथे हेरगिरी व संशोधन जहाजे पाठवतानाच दीर्घकाळ नौदलासाठी तळ उभारत आहे.

‘साऊथ चाईना सी’मध्ये चीनने समुद्रतळातील ठिकाणांची नवीन नावे ठेवणे, ऐतिहासिक हक्कांचा दावा करणे, असे डावपेच वापरले.

आयोगाच्‍या अमेरिकन सरकारला सूचना

* चीनची चाल हाणून पाडण्यासाठी अमेरिकेने ठोस पावले उचलण्याची गरज.

* भारत व अमेरिकेला प्रत्यक्ष जमिनीवर एकत्र काम करावे लागेल.

* दोन्ही देशांनी मिळून चिनी पाणबुड्या व युद्धनौकांचा प्रत्यक्ष मागोवा घ्‍यावा.

* ‘इंडो-अमेरिकन स्ट्रॅटेजिक लीडरशिप एक्‍स्‍चेंज प्रोग्राम’ सुरू करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.