China Flood : चीनमध्ये मुसळधार पावसामुळे पूल कोसळून 20 ठार, 60 हून अधिक बेपत्ता

30 हून अधिक नद्यांनी धोक्याची पातळी ओलाडली
china flood
चीनमध्ये मुसळधार पावसामुळे पुराने हाहाकार माजवला आहे.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : China Flood : चीनमध्ये मुसळधार पावसामुळे पुराने हाहाकार माजवला आहे. येथील 30 हून अधिक नद्यांनी धोक्याची पातळी ओलाडली आहे. दरम्यान, चीनच्या शांक्सी प्रांतात मुसळधार पावसामुळे महामार्गावर बांधलेला पूल कोसळला. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 हून अधिक जण बेपत्ता आहेत.

चीन सरकारच्या म्हणण्यानुसार, शांक्सी प्रांतात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे शुक्रवारी रात्री सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या जवळपास शांगलुओ येथे नदीवरील पूल कोसळला. महामार्गावरील पूल नदीत पडल्यानंतर अनेक वाहने नदीत कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेत नेमक्या किती वाहनांचा समावेश आहे याचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. शनिवारी सकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी 20 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 60 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बचाव कार्यात मार्गदर्शन करण्यासाठी एक पथक पाठवण्यात आले आहे. चीनच्या राष्ट्रीय व्यापक अग्निशमन आणि बचाव पथकाने 736 लोक, 76 वाहने, 18 बोटी आणि 32 ड्रोन बचाव कार्यासाठी पाठवले आहेत. ते म्हणाले की, बचाव पथकाने नदीत पडलेल्या पाच वाहनांना बाहेर काढले असून बचाव कार्य सुरू आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पूल कोसळल्यानंतर लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी बचाव कार्य युद्ध पातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news