

चीन : चीनमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनएससी) माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी होती. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत १० किलोमीटर खोलवर होते.
तत्पूर्वी, रात्री १२.४७ वाजताच्या सुमारास अफगाणिस्तानातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.