Chandrayaan 3 Moon Landing Live | भारत ठरणार विश्वविक्रमादित्य; चांद्रयान-३ चे लॅंडिंग पाहा लाईव्ह

Chandrayaan 3 Moon Landing Live | भारत ठरणार विश्वविक्रमादित्य; चांद्रयान-३ चे लॅंडिंग पाहा लाईव्ह

पुढारी ऑनलाईन : गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश (Chandrayaan 3 Landing Live) ठरणार आहे. चांद्रयान-3 ची ही मोहीम जगभरातील नागरिकांना लाईव्ह देखील पाहता येणार आहे.

इस्रो बुधवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी आपल्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे यूट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) अकाऊंट आणि फेसबुक पेजवरून ते सर्वांना पाहता येणार आहे. इस्रोच्या वेबसाईटवरही क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध (Chandrayaan 3 Landing Live) करून दिली जाणार आहे.

चांद्रयान-३ ही मोहिम जरी भारताची असली तरी साऱ्या जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. प्रत्येक भारतातील नागरिक या मोहिमेसाठी उत्सुक आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये देखील या मोहीमेविषयी विशेष कुतूहल पाहायला मिळत आहे.
चांद्रयानाचे ऐतिहासिक लँडिंग आता लाईव्ह (Chandrayaan 3 Landing Live) पाहता येणार आहे.

Chandrayaan 3 Landing Live : चांद्रयान-३ पाहा 'या' लिंकवर लाईव्ह

ISRO वेबसाइट – https://www.isro.gov.in/

ISRO यूट्यूब – https://www.youtube.com/@isroofficial5866/about

डीडी नॅशनल टीव्ही- https://www.youtube.com/watch?v=fVq6-bn603M

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news