Shigella Infection: 'या' बेटावर गेलेल्या पर्यटकांचा का होतोय मृत्यू; ८०० जणांची न्यायालयात धाव, नेमका प्रकार काय?

Shigella Infection
Shigella Infectionpudhari
Published on
Updated on

Cape Verde Outbreak Shigella Infection: केप वर्दे या बेटांवर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये 'शिगेला' (Shigella) आणि 'साल्मोनेला' (Salmonella) यांसारख्या गंभीर जिवाणू संसर्गाची लाट आली आहे. ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत तपासणीमध्ये १५० हून अधिक प्रकरणे समोर आली असून, यामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश पर्यटकांचा समावेश आहे. या आरोग्य संकटामुळे आता कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे पडसाद उमटत आहेत.

Shigella Infection
Bio Waste to Fuel | जैविक कचर्‍यातून इंधननिर्मिती

नेमका प्रकार काय?

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, केप वर्देमधील साल (Sal) आणि बोआ विस्टा (Boa Vista) यांसारख्या प्रसिद्ध रिसॉर्ट भागांतून परतलेल्या पर्यटकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (जठरांत्र) संसर्गाची लक्षणे दिसून आली आहेत. यात 'शिगेला सोनेई' या जिवाणूचे प्रमाण सर्वाधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान तीव्र गॅस्ट्रिक आजारामुळे सहा ब्रिटिश पर्यटकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

Shigella Infection
ISOMED 2.0 Turbhe Project: तुर्भेतील ‘आयसोमेड 2.0’मुळे अणुऊर्जा तंत्रज्ञानाला नवे बळ; निर्जंतुकीकरण प्रक्रिया अधिक वेगवान

कायदेशीर कारवाईचा बडगा

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सुमारे ८०० ब्रिटिश पर्यटकांनी युकेच्या उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. एका नामांकित लॉ फर्मने एका मोठ्या टूर ऑपरेटरविरुद्ध लाखो पौंडांचा दावा दाखल केला आहे. रिसॉर्टमधील अन्नाचा दर्जा, पाण्याची स्वच्छता आणि हायजीन मानकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. यामध्ये साल्मोनेलासह ई-कोलाय (E. coli) आणि क्रिप्टोस्पोरिडियम यांसारख्या संसर्गाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Shigella Infection
kerosene stove availability issue : गॅस टंचाई : रॉकेल आले... पण स्टोव्ह कुठे ?

प्रशासकीय पावले आणि खबरदारी

मार्च २०२६ मध्ये 'फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस'ने (FCDO) आपल्या ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये सुधारणा केली असून पर्यटकांना अन्न आणि पाण्याबाबत अत्यंत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. युरोप आणि अमेरिकेतील आरोग्य यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, 'जीनोम सिक्वेन्सिंग'द्वारे या संसर्गाचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या संकटामुळे केप वर्देच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, रिसॉर्ट्सच्या सुरक्षा मानकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news