

आपल्या दातांची निगा राखण्यात कमी पडलेल्या सैनिकांना देश सेवेच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे ब्रिटिश सैन्याने हा कठोर निर्णय घेतला आहे. तसेच, मुरुम आणि मानसिक आजारांमुळेही सैनिकांना नोकरी गमवावी लागत आहे. गेल्या चार वर्षांत अस्वच्छ आणि किडलेल्या दातांमुळे १७३ सैनिकांना ब्रिटिश सैन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जे सैनिक आपल्या दातांची काळजी घेऊ शकत नाहीत, ते सैन्याच्या महत्त्वाच्या मोहिमांची जबाबदारी कशी सांभाळणार, असा ब्रिटिश सैन्याचा युक्तिवाद आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश लष्करात काही जवांनांना त्यांच्या खराब दातांमुळे कामावरून काढून टाकले आहे. गेल्या चार वर्षांत, हिरड्यांचे आजार किंवा किडलेल्या दातांमुळे १७३ नव्या जवानांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ४७,००० सैनिकांपैकी वैद्यकीय कारणास्तव ज्यांची निवड रद्द करण्यात आली होती, त्यात यांचा समावेश आहे. जूनमध्ये प्रकाशित आकडेवारीनुसार, सुमारे २६,००० सैनिकांना दातांची कीड आणि हिरड्यांच्या आजारांवर उपचारांची गरज होती.
एका अलीकडील अभ्यासानुसार, विविध ऑपरेशन्स आणि मोहिमांवर तैनात असलेल्या प्रत्येक १,००० सैनिकांपैकी १५० जणांना कधी ना कधी दंत उपचारांची आवश्यकता भासते. अफगाणिस्तानमध्ये, सैनिकांना तातडीच्या दंत उपचारांसाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागते.
ब्रिटिश डेंटल असोसिएशनच्या मते, अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्धापेक्षा दातांच्या समस्यांमुळे अधिक सैनिक सेवा करण्यास अक्षम ठरले. संशोधनात असे दिसून आले आहे की, सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना समाजातील इतर लोकांपेक्षा दुप्पट दातांच्या समस्या असतात आणि त्यापैकी बहुतेक गरीब पार्श्वभूमीतून येतात.
२०२० ते २०२४ या कालावधीतील आकडेवारी दर्शवते की, वैद्यकीय कारणांमुळे नाकारलेल्या सुमारे अर्ध्या उमेदवारांना मानसिक समस्या होत्या. संभाव्य सैनिकांना हृदयविकार, प्रजनन समस्यांमुळेही नाकारण्यात आले आहे.
आपले दात स्वच्छ ठेवण्यात कमी पडणाऱ्या किंवा दातांच्या समस्या असलेल्या सैनिकांना ब्रिटिश सैन्य दलातून काढून टाकले जात आहे. तसेच, मुरुम आणि मानसिक आजारांमुळेही सैनिकांना नोकरी गमवावी लागत आहे. गेल्या चार वर्षांत अस्वच्छ आणि किडलेल्या दातांमुळे १७३ सैनिकांना ब्रिटिश सैन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जे सैनिक आपल्या दातांची काळजी घेऊ शकत नाहीत, ते सैन्याच्या महत्त्वाच्या मोहिमांची जबाबदारी कशी सांभाळणार, असे ब्रिटिश सैन्याचे म्हणणे आहे.
डेली स्टारच्या अहवालानुसार, ब्रिटिश सैन्याने काही नवीन सैनिकांना त्यांच्या खराब दातांमुळे कामावरून काढून टाकले आहे. गेल्या चार वर्षांत, हिरड्यांचे आजार किंवा किडलेल्या दातांमुळे १७३ नवीन सैनिकांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ४७,००० सैनिकांपैकी वैद्यकीय कारणास्तव ज्यांची निवड रद्द करण्यात आली होती, त्यात यांचा समावेश आहे. जूनमध्ये प्रकाशित आकडेवारीनुसार, सुमारे २६,००० सैनिकांना दातांची कीड आणि हिरड्यांच्या आजारांवर उपचारांची गरज होती.
एका अलीकडील अभ्यासानुसार, विविध ऑपरेशन्स आणि मोहिमांवर तैनात असलेल्या प्रत्येक १,००० सैनिकांपैकी १५० जणांना कधी ना कधी दंत उपचारांची आवश्यकता भासते. अफगाणिस्तानमध्ये, सैनिकांना तातडीच्या दंत उपचारांसाठी कॅम्प बॅस्टियन येथे पोहोचवण्यासाठी दूरस्थ तळांवर हेलिकॉप्टर पाठवले जात होते.
ब्रिटिश डेंटल असोसिएशनच्या मते, अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्धापेक्षा दातांच्या समस्यांमुळे अधिक सैनिक सेवा करण्यास अक्षम ठरले. संशोधनात असे दिसून आले आहे की, सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना समाजातील इतर लोकांपेक्षा दुप्पट दातांच्या समस्या असतात आणि त्यापैकी बहुतेक गरीब पार्श्वभूमीतून येतात.
२०२० ते २०२४ या कालावधीतील आकडेवारी दर्शवते की, वैद्यकीय कारणांमुळे नाकारलेल्या सुमारे अर्ध्या उमेदवारांना मानसिक समस्या होत्या. संभाव्य सैनिकांना हृदयविकार, प्रजनन आणि तापाच्या समस्यांमुळेही नाकारण्यात आले आहे.
जवळपास १,८०० सैनिकांना मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांमुळे भरती करण्यास नकार देण्यात आला. ब्रिटिश लष्कारात सध्या जवळपास ७१ हजार जवान आहेत, तर शतकाच्या सुरुवातीला ही संख्या १,००,००० होती. संरक्षण सचिव जॉन हेली यांनी ही उणीव भरून काढण्यासाठी काही वेळ लागेल, असे मान्य केले.
भरती करणारी कंपनी कॅपिटाचे रिचर्ड होलरॉइड यांनी खासदारांना सांगितले की, वैद्यकीय गरजा इतक्या कठोर आहेत की, इंग्लंडच्या रग्बी संघालाही प्रवेश नाकारला जाईल. त्यांनी सांगितले की, कॅपिटाने २०२३-२४ साठी ९,८१३ सैनिकांची भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु गेल्या वर्षी एप्रिलपासून आतापर्यंत केवळ ५,००० जणांचीच भरती झाली आहे.