

पुढारी ऑनलाईन : चीनमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीचे प्रकरण समोर आले आहे. एका विवाहित पुरूष आपल्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. न्यायालयाने गर्लफ्रेंडला मृत प्रियकराच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
ही घटना चीनच्या गुआंग्शी झुआंग प्रांतातील पिंगनान काउंटी येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव झोउ असून ते ६६ वर्षांचे होते. ते विवाहित होते. मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनूसार झोउ यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि यापूर्वी त्यांना स्ट्रोकचा झटका येऊन गेला होता.
मृत्यूच्या काही तास अगोदर झोउ आपली गर्लफ्रेंड झुआंग हिच्यासोबत हॉटेलच्या रूमवर गेले होते. रूमवर झोउ आणि त्याची गर्लफ्रेंड या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्तापित झाले व दोघेही झोपी गेले. काही वेळेनंतर त्याची गर्लफ्रेंड झोपेतून उठली व तिने झोउ यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलेच नाहीत. ती प्रचंड घाबरली. झोउ बेशुद्ध अवस्थेत असताना घाबरलेल्या झुआंग यांनी रुग्णवाहिकेला किंवा हॉटेल प्रशासनाला याची माहिती न देता त्यांना स्वतःला रक्तदाबाचा त्रास असल्याने औषध घेण्यासाठी हॉटेल रूममधून बाहेर पडल्या.
काही तासातच ती पुन्हा हॉटेलमध्ये परतली तिने हॉटेलमधील स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला व आत गेली असता ही घटना उघडकीस आली. हॉटेलमधील या घडलेल्या घटनेची माहीती पोलिसांना दिली. डॉक्टर आणि पोलिसांच्या तपासातून झोउचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाची माहिती झोउ यांची पत्नी व मुलगा यांनी झोउ यांच्या मृत्यूची बातमी कळताच न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या पत्नी व मुलगा यांनी गर्लफ्रेंड झुआंग आणि हॉटेल प्रशासन यांच्याकडून ५.५ लाख युआन म्हणजे सुमारे ६६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली. यात झोउचे उपचार आणि अंत्यसंस्कार याचा खर्च समाविष्ट केला होता.
झोउ यांचा मृत्यू जुन्या आजारामुळे झाला असा निकाल न्यायालयाने दिला. पण न्यायालयाने गर्लफ्रेंड झुआंगला निर्दोष मानण्यास नकार दिला. कारण संकटकाळात मदत मागण्याऐवजी हॉटेलच्या रूममधून पळून गेली हा बेजबाबदारपणा आहे. जर झोउ यांना योग्य वेळी मदत मिळाली असती तर झोउ यांच्यावर उपचार झाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. झोउ यांच्या मृत्यूसाठी त्यांचे आजारपण ९० टक्के जबाबदार असले तरीही १० टक्के गर्लफ्रेंडचा बेजबाबदार पणाही कारणीभुत आहे. याच आधारावर न्यायालयाने गर्लफ्रेंडला झोउ यांच्या कुटुंबाला ६२ हजार युआन म्हणजे सुमारे ८.६ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.