Taiwan Earthquake | तैवानला २४ तासांत दुसरा भूकंप, ६.३ रिश्टर स्केलची नोंद

तैवानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप
Taiwan Earthquake
आज (दि.१६) तैवानच्या पूर्वेकडील शहर हुआलियनपासून ३४ किमी अंतरावर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.Earthquake File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Taiwan Earthquake | गुरुवारी उशिरा झालेल्या ५.७ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर आज (दि.१६) तैवानच्या पूर्वेकडील शहर हुआलियनपासून ३४ किमी अंतरावर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ९.७ किमी खोलीच्या या भूकंपाने तैपेईमधील इमारतींना हादरे बसले.

का होतो भूकंप?

पृथ्वीच्या आत 7 वेगवेगळ्या प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. यावेळी पृथ्वीखाली असलेली उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते.

Taiwan Earthquake
टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडणार

जाणून घ्या? भूकंपाचे केंद्र आणि तीव्रता याचा अर्थ काय?

भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी भूगर्भीय प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वीला हादरे बसतात किंवा हालचालीची तीव्रता अधिक असते त्याला भूकंपाचे केंद्र मानले जाते. या ठिकाणी भूकंपाची कंपने अधिक तीव्र असतात. रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर 40 किमीच्या त्रिज्येत हा धक्का तीव्र असतो.

Taiwan Earthquake
बांगलादेशचे उदाहरण देत सरन्‍यायाधीशांनी सांगितले 'स्वातंत्र्या'चे महत्त्व

भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते?

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या प्रमाणाचा वापर केला जातो. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता मोजली जाते. ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news