Bone Glue Invention :
चीनच्या वैज्ञानिकांनी एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांनी जगातील पहिला बोन ग्लू तयार केला आहे. या ग्लूद्वारे तुटलेलं हाड २ ते ३ मिनिटात जोडता येणार आहे. हा बोन ग्लू पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. जवळपास सहा महिन्यात हा शरिरात विरघळून जातो. यामध्ये मेटल इम्प्लांटची गरज भासत नाही.
चीनच्या वैज्ञानिकांनी बोन ०२ अशा नावाचं बायोमटेरियल विकसित केलं आहे. हे हाड चिकटवण्यासाठी वापरण्यात येतं. समुद्रात चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थावरून याची प्रेरणा घेण्यात आली आहे. डॉक्टर लिन जियानफेंग यांना असं आढळून आलं की सीप लाटा आणि पाण्याच्या धारेमध्ये देखील हलत नाही. तर रक्ताच्या प्रवाहात हाडांना देखील चिकटंवलं जाऊ शकतं का असं विचार त्यांच्या मनात आला.
यानंतर त्यांनी बोन ग्लूची निर्मिती केली. हा ग्लू २०० किलोपेक्षा जास्त वजन पेलण्याची ताकद ठेवतो. शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर केला तर तुटलेली हाडं २ ते ३ मिनिटात चिकटवता येतात. यापूर्वी हाडं जोडण्यासाठी धातूचा वापर करण्यात येत होता. हा धातू काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागत होती. मात्र आता या बोन ग्लू हा शरीरात ६ महिन्यात विरघळून जातो. त्यामुळे दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही.
बोन ग्लू हा शस्त्रक्रियेपूर्वी एक चिकट पदार्थ असतो. हा पदार्थ रक्ताच्या प्रवाहात देखील मजबूतीनं चिकटून राहतो. शास्त्रज्ञांनी ५० पेक्षा जास्त फॉर्म्युल्यांमध्ये याचं टेस्टिंग केलं आहे. त्यांनी शेकडो प्रयोग करून पाहिले आहेत. हा पदार्थ बायोसेफ आहे. त्यामुळे तो शरीरासाठी सुरक्षित आहे. हाड जुळून येण्यासाठी याची चांगली मदत होते.
चीनमधील वेंजाऊ मधील डॉक्टर लिन यांच्या टीमनं हा बोन ग्लू विकसित केला आहे. आतापर्यंत हा हा ग्लू १५० पेक्षा जास्त रूग्णांवर टेस्ट करून झाला आहे. सध्या तरी या सर्व टेस्टिंगमध्ये हा सुरक्षित आणि प्रभावी ठरला आहे. हाड तुटेणे, फ्रॅक्चर, अर्थोपेडिक सर्जरीमध्ये हा ग्लू एक क्रांती घडवून आणेल असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. यामुळे शस्त्रक्रियेतील वेळ देखील वाचणार आहे.