लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड हिल्स आगीत ज‍ळतंय!, प्रियांका चोप्रानं शेअर केला वणव्याचा Video

Los Angeles wildfire | ५ जणांचा मृत्यू, २ हजारहून घरे, मोठ्या इमारती जळून खाक
Los Angeles wildfire, Priyanka Chopra
प्रियांका चोप्राने तिच्या घरातून लॉस एंजेलिसमधील वणव्याचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Image source- Priyanka Chopra instagram)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमधील (Los Angeles wildfire) जंगलाला लागलेल्या भीषण आगीने हाहाकार उडाला आहे. या आगीत आतापर्यंत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत लॉस एंजेलिस काउंटीमधील २ हजारहून घरे, मोठ्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. या प्रदेशातील ही सर्वात विनाशकारी घटना आहे.

लॉस एंजेलिसमधील हजारो लोकांनी घरे सोडली, आणीबाणी जाहीर

लॉस एंजेलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे (Hollywood Hills) घर म्हणून ओळखले जाते. सध्याच्या आगीच्या वणव्यामुळे हॉलिवूडसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत त्यांनी तीन मोठ्या आगींवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीमुळे लॉस एंजेलिसमधील हजारो लोकांना घरे सोडून जावे लागले आहे. येथील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

उंच इमारती, अलिशान घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

येथे ताशी ७० मैल वेगाने वारे वाहत असल्याने आगीचा वळवा वेगाने पसरत आहे. या आगीत जंगलासह उंच इमारती आणि अलिशान घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. पहिल्यांदा आग पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये लागली होती. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले आणि ही आग लीडिया, वुडली आणि सनसेटपर्यंत पोहोचली.

हॉलिवूड सीटीमध्ये आगीने कहर

लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड सीटीमध्ये आगीने कहर केला आहे. येथील ७० हजार एकरहून अधिक क्षेत्र जळून खाक झाले आहे. लॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे केंद्र आहे.

प्रियांका चोप्राने व्यक्त केली चिंता! घरातून शेअर केला वणव्याचा व्हिडिओ

बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लॉस एंजेलिसमध्ये राहाते. तिने येथील आगीच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रियांकाने तिच्या घरातून वणव्याचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने येथे राहणाऱ्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये काही अंतरावर वेगाने पसरणाऱ्या आगीच्या ज्वाळा दिसतात. "माझ्या संवेदना येथील प्रभावित सर्वांसोबत आहेत. आपण सर्वजण आज रात्री सुरक्षित राहू, अशी मला आशा आहे," अशी कॅप्शन तिने क्लिपला दिली आहे.

प्रियांकाने आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अग्निशमन दलाच्या हेलिकॉप्टरचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्यांच्याप्रति आभार व्यक्त करत तिने म्हटले आहे, "अविश्वसनीय धाडसी अग्निशमन दलाला खूप खूप धन्यवाद. त्यांनी रात्रभर अथक परिश्रम केल्याबद्दल आणि प्रभावित कुटुंबांना मदतीचा हात दिल्याबद्दल धन्यवाद."

Los Angeles wildfire, Priyanka Chopra
Ishika Taneja | 'या' अभिनेत्रीने बॉलिवूडला म्हटलं अलविदा, बनली साध्वी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news