Whale milk feeding | 100 टनाचा देवमासा आपल्या पिलाला कसे दूध पाजतो पहा! अमेरिकन डॉक्टरने शेअर केला व्हिडीओ

समुद्रातील एक आश्चर्य: निळ्या देवमाशाचे दूध म्हणजे पिलासाठी असते ‘लिक्विड गोल्ड’
Whale milk feeding | 100 टनाचा देवमासा आपल्या पिलाला कसे दूध पाजतो पहा! अमेरिकन डॉक्टरने शेअर केला व्हिडीओ
Published on
Updated on

Whale milk feeding समुद्राच्या अथांग खोलीत वावरणारा निळा देवमासा (Blue Whale) केवळ त्याच्या अवाढव्य आकारामुळेच नाही, तर त्याच्या जीवनचक्रातील वैशिष्ट्यांमुळेही विज्ञानाला थक्क करतो. पण आजतायगायत हा सस्तन प्राणी असलेला देवमासा आपल्या पिलाला कसा जन्म देतो हे कोणत्‍याही शास्त्रज्ञाला दिसलेले नाही. पण आता एका अमेरिकन डॉक्टरने Dr. Afshine Emrani एक व्हिडीओ शेअर करत देवमाशाच्या मातृत्‍वाचे दर्शन घडवले आहे. या व्हिडीओमध्ये खोल समुद्रात एक देवमासा आपल्या पिलाला दूध पाजताना दिसत आहे.

दूध पाजण्याची अनोखी पद्धत

देवामाशाला कोणतेही स्तनाग्र नसतात पण त्‍यांच्या शरिरावर असलेल्या विशिष्ट खाच्यांमधून हे दूध बाहेर येते. स्तनपान करण्याची पद्धतीही खूपच अनोखी असते. देवमासा आपल्या स्नायूनां जोर देऊन दूध बाहेर फेकतो ते बरोबर आपल्या पिलाच्या तोंडात. पण पाण्यामध्ये हे दूध मिसळत नाही का असा प्रश्न पडतो पण निसर्गाने हे दूध क्रिमसारखे घट्ट बनवलेले असते त्‍यामुळे ते समुद्राच्या खाऱ्या पाण्यातही विरघळत नाही.

Whale milk feeding | 100 टनाचा देवमासा आपल्या पिलाला कसे दूध पाजतो पहा! अमेरिकन डॉक्टरने शेअर केला व्हिडीओ
Blue Whale | व्हेल माशाचे दूध असते टूथपेस्ट एवढे घट्ट, स्तन नसूनही पिलाला दूध पाजण्याची पद्धतही अनोखी

पिलासाठी असते 'लिक्विड गोल्ड'

व्हेलचे हे दूध अत्यंत घट्ट आणि समृद्ध असते. मानवी दुधाच्या तुलनेत हे दूध १५ पटीने अधिक घट्ट असून, त्यात ५० टक्के फॅट्स असतात. हे दूध एखाद्या मऊ लोण्यासारखे किंवा घट्ट क्रीमसारखे असते. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात दूध विरघळू नये, म्हणून निसर्गानेच या दुधाची रचना अशी केली असते . यामुळे हे दूध विरघळण्याऐवजी थेट पिल्लापर्यंत पोहोचते, ज्यामुळे पिल्लाचे वजन दररोज तब्बल २०० पौंडांनी वाढते. त्‍यामुळे पिलासाठी हे दूध म्हणजे 'लिक्विड गोल्ड' प्रमाणे केली आहे

Dr. Afshine Emrani यांनी शेअर केला आहे व्हीडीओ

Dr. Afshine Emrani हे अमेरिकेतील एक कार्डीयालॉजिस्ट आहेत ते प्रामुख्याने कॅलिफोर्नियामधील लॉसमध्ये कार्यरत असतात. त्‍यांनी (@afshineemrani) या आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन व्हिडीओ शेअर करताना लिहले आहे की एका कारच्या आकाराचे हृदय आणि आईच्या दुधातील सूक्ष्म अचूकता हे सर्व पाहता, हे केवळ 'सर्वायव्हल' (जगण्याची धडपड) नसून एक अभियांत्रिकी नमुना आहे, असे मानले जात आहे. समुद्राच्या खोलीपासून ते आपल्या श्वासापर्यंत, प्रत्येक गोष्टीत एक विशिष्ट नियोजन आणि हेतू दिसून येतो. निसर्गाची ही रचना म्हणजे एक 'दैवी कलाकृती' असल्याचे अधोरेखित होते. 21 एप्रिल रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखाच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news