Blue Whale | व्हेल माशाचे दूध असते टूथपेस्ट एवढे घट्ट, स्तन नसूनही पिलाला दूध पाजण्याची पद्धतही अनोखी

Namdev Gharal

जरी व्हेल हा मासा हा समुद्रात राहत असल्यामुळे त्‍याला आपण मासा म्हणतो पण तो असतो सस्तन प्राणी. आणि तोही जमिनीवरील इतर सस्तन प्राण्यांप्राणे जन्म देतो व दूध पाजतो

पण हा महाकाय प्राणी समुद्रात राहत असल्यामुळे व समुद्राच्या खारट पाण्यात पिलाला स्तनपान करणे हे काम वाटते तितके सोपे नाही

त्‍यामुळे व्हेल माशाचे दूध आणि त्याच्या स्तनपानाची पद्धत ही निसर्गातील सर्वात आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक आहे.

व्हेलचे दूध गाईच्या दुधासारखे पातळ नसते. ते टूथपेस्टसारखे अतिशय घट्ट असते. यात फॅट्सचे प्रमाण ३५% ते ५०% पर्यंत असते (गाईच्या दुधात केवळ ४-५% फॅट असते).

हे पातळ असते तर समुद्राच्या पाण्यात पातळ दूध लगेच विरघळून गेले असते. पण दूध घट्ट असल्यामुळे ते पाण्यात विरघळत नाही आणि पिल्लू ते सहज गिळू शकते.

तसेच, या उच्च चरबीयुक्त दुधामुळे पिल्लाच्या शरीरावर संरक्षणात्मक चरबीचा थर अतिशय वेगाने तयार होतो.

व्हेलला इतर प्राण्यांसारखे स्तन नसतात. तिच्या शरीरावर 'मॅमरी स्लिट्स' (Mammary Slits) नावाच्या खास भेगा असतात.

जेव्हा पिल्लू आईच्या जवळ येते, तेव्हा आई स्वतःहून दूध Inject करते. म्हणजेच ती आपल्या स्नायूंच्या साहाय्याने दूध पिल्लाच्या तोंडात फवारते.

हे पौष्टिक दूध पिल्यामुळे ब्लू व्हेलच्या पिल्लाचे वजन दररोज साधारणपणे ९० किलोने वाढते. म्हणजेच तासाला जवळजवळ ४ किलो वजन वाढते

आर्श्चयाची गोष्ट म्हणजे एक ब्लू व्हेलचे पिल्लू दिवसाला तब्बल ४०० ते ६०० लिटर दूध पिऊ शकते! हे प्रमाण एखाद्या मोठ्या पाण्याच्या टाकीएवढे आहे.