बांगलादेशात आंदोलकांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला

Bangladesh Violence Protests : बांगलादेशमध्ये लष्कराचे अंतरिम सरकार स्थापन होणार
Bangladesh Violence Protests
बांगलादेशात हिंसक आंदोलकांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला. Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bangladesh Violence Protests : बांगलादेशात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रचंड जाळपोळ आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन हेलिकॉप्टरने देश सोडल्याची बातमी येत आहे. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हिंसक आंदोलक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळाही फोडताना दिसत आहेत.

बांगलादेशातून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून तो फोडताना दिसत आहेत. आंदोलक इतके संतप्त झाले आहेत की त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून हातोड्याच्या सहाय्याने त्याची तोडफोड केल्याचे दिसत आहे. देशव्यापी कर्फ्यूकडे दुर्लक्ष करून हजारो आंदोलक ढाक्यातील शाहबाग चौकात लाँग मार्चसाठी जमले आहेत. यापूर्वी रविवारी (दि. 4) झालेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी पत्रकार परिषदेत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले, ‘आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू. तोडफोडीपासून दूर राहा. तुम्ही लोक आमच्यासोबत आलात तर आम्ही परिस्थिती बदलू. अराजकता आणि संघर्षापासून दूर राहा. आम्ही आज सर्वपक्षीय नेत्यांशी बोललो आहोत. ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news