

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमधील ढाका शहरातील एका तलावात महिला पत्रकाराचा मृतदेह आढळून आला आहे. सारा रहनुमा असे मृत महिला पत्रकाराचे नाव आहे. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
माहितीनुसार बांगलादेशमधील ढाका शहरातील एका तलावात महिला पत्रकाराचा मृतदेह आढळून आला आहे. महिला टीव्ही पत्रकार ३२ वर्षीय असुन तिचा मृतदेह आज (दि.२८) सापडला. तिचे नाव सारा रहनुमा असे आहे. ती गाझी ग्रुपच्या मालकीच्या बंगाली भाषेतील उपग्रह आणि केबल टेलिव्हिजन चॅनेल न्यूजरूम संपादक होती. ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार तिचा मृतदेह ढाक्यातील हातीरझिल तलावात तरंगताना आढळून आला.