Bangladesh Protests | शेख हसीना यांचा लंडनला जाण्याचा प्लॅन बदलला?

अजित डोवाल यांची घेतली भेट; पुढची रणनीती ठरली?
Bangladesh Protests
शेख हसीना यांचा लंडनला जाण्याचा प्लॅन बदलला? file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आरक्षणविरोधी आंदोलन व यातून पेटलेल्या वणव्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना हवाई दलाच्या विमानातून सोमवारी दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, काही वरिष्ठ लष्करी कर्मचारी आणि गुप्तचर संस्थांचे लोक उपस्थित होते. डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली. यानंतर हसीना दिल्लीहून लंडनला जाणार होत्या. पण रात्री उशिरापर्यंत लंडनला जाण्याचा बेत बदलल्याची माहिती मिळत आहे.

लंडनला जाण्याचा प्लॅन का बदलला?

बांगलादेशचे १५ वर्ष नेतृत्व केल्यानंतर 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना सोमवारी मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी निदर्शने शिगेला पोहोचल्याने राजीनामा देऊन देश सोडून पळून जावे लागले. त्यांनी देश सोडल्यानंतर माजी सत्ताधारी पक्ष अवामी लीग वगळता राजकीय पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर लवकरच नवीन अंतरिम सरकार स्थापन केले जाईल, असे बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी सांगितले. दरम्यान, शेख हसीना सोमवारी लष्कराच्या विमानाने भारतात दाखल झाल्या. अधिकाऱ्यांनी आधी शेख हसिना या दिल्लीहून लंडनला रवाना झाल्याची माहिती दिली, परंतु नंतर सांगण्यात आले की पुढील योजना अद्याप अस्पष्ट आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्या रात्री आलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या योजनेत काही बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शेख हसीना यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले

अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर शेख हसीना यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. हसीना या दिल्लीत राहणारी त्यांची मुलगी सायमा वाजिदला भेटण्याची शक्यता आहे. सायमा वाजिद या दक्षिण-पूर्व आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालिका आहेत.

शेख हसीना यांचे ब्रिटनच्या ग्रीन सिग्नलकडे लक्ष

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडले. त्यांचे विमान दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर उतरले. त्यानंतर शेख हसीना गेल्या १४ तासांपासून गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर सुरक्षित गृहात आहेत. जोपर्यंत त्यांची भविष्यातील योजना ठरत नाही तोपर्यंत त्या तिथेच राहणार आहेत. दरम्यान, त्या ब्रिटनच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news