Sheikh Hasina : शेख हसीनांवरील आरोप निश्‍चित, दोषी आढळल्यास मृत्युदंडाची शक्यता

युनूस सरकारने ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात आरोपपत्र केले दाखल
sheikh hasina
बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना.File Photo
Published on
Updated on

ढाका: बांगलादेशमध्‍ये जुलै २०२४ मध्‍ये झालेल्‍या जनआंदोलनावेळच्‍या हिंसाचारासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina) जबाबदार आहेत, असा गंभीर आराेप बांगलादेश सरकारने आज (दि.१ जून) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणा(आयसीटी)मध्‍ये केला. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांवेळी झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी आरोप निश्‍चित करण्‍यात आले आहेत. या प्रकरणी माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी मामुन यांनाही सह-आरोपी करण्‍यात आले आहे. या खटल्याचे बांगलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. दरम्‍यान, १९७१ च्या मुक्ती युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या सहकार्यांवर खटला चालवण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाने यापूर्वी अनेक जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. अशा परिस्थितीत आता शेख हसीना यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे.

शेख हसीना सामूहिक हत्याकांडाच्‍या मुख्य सूत्रधार : सरकारी वकील

हसीना यांनी वैयक्तिकरित्या सुरक्षा दलांना आणि राजकीय मित्रांना निदर्शकांवर बळाचा वापर करण्याचे आदेश दिल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. सरकारी वकिलांनी ढाका येथील न्यायाधिकरणात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, हा खटला जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या जनआंदोलन आणि त्या काळात झालेल्या हिंसक घटनांशी संबंधित आहे. सरकारी वकिलांनी शेख हसीना यांना देशभरातील सामूहिक हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार म्‍हटले आहे. आरोपपत्रात, माजी गृहमंत्री असदुज्ज्झमान खान कमाल आणि माजी पोलिस महासंचालक (IGP) चौधरी मामून यांनाही त्यांच्यासोबत सह-आरोपी करण्यात आले आहे.

sheikh hasina
१३ महिन्यांत भारत-बांगलादेश सीमेवर २ हजार ६०१ घुसखोरांना अटक

शेख हसीना यांच्‍यावर कोणते आरोप?

मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी म्‍हटलं आहे की, शेख हसीना यांच्‍यवर एकूण पाच गंभीर आरोप ठेवण्‍यात आले आहेत. यामध्ये सामूहिक हत्या रोखण्यात अपयश, हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न, कट रचणे, हत्येत सहभाग, बंडखोरांविरुद्ध अतिरेकी बळाचा वापर करण्यास मान्यता देणे यांचा समावेश आहे. सरकारने न्‍यायालयात दावा केला की, त्यांच्याकडे देशात उसळलेल्‍या हिंसाचाराचा व्हिडिओ फुटेज, ऑडिओ रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्ड, ड्रोन आणि हेलिकॉप्टर हालचालींचे पाळत ठेवणारे अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यासह अनेक महत्त्वाचे पुरावे आहेत.

sheikh hasina
अखेर बांगलादेश सरकारला आली जाग! मंदिर तोडफोडप्रकरणी चौघांना अटक

मृत्युदंडाची शिक्षा देखील शक्य

१९७१ च्या मुक्ती युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या सहकार्यांवर खटला चालवण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाने यापूर्वी अनेक जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. अशा परिस्थितीत, शेख हसीना यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे. बांगलादेश सरकारने शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट आधीच जारी केले आहे. सध्‍या त्‍यांवे वास्‍तव्‍य भारतात आहे. अंतरिम सरकारने औपचारिकपणे त्यांना भारतातून मायदेशी परत पाठवण्याची विनंती केली आहे. शेख हसीना प्रशासनातील बहुतेक वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या हिंसाचारात त्यांच्यावर सामूहिक हत्येपासून ते मतभेद दडपण्यापर्यंतचे आरोप आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने जाहीर केलेल्‍या माहितीनुसार १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत बांगलादेशात विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्‍ये झालेल्‍या हिंसाचारात सुमारे १,४०० नागरिकांचा मृत्‍यू झाला होता.

sheikh hasina
‘भारत-बांगलादेश सीमेच्या ३२३२.२१८ किमी क्षेत्रावर कुंपण घातले’

शेख हसीना यांनी सर्व आरोप फेटाळले

खटला त्यांना आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. सर्व आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत, असे शेख हसीना यांनी म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news