बाबा वेंगाचा २०२६ बद्दल इशारा : महायुद्ध, महाविनाश आणि मानवजातीसमोर AI चं संकट

बाबा वेंगाच्या याआधीच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याने लोकांमध्ये नव्या वर्षाच्या भविष्यवाण्यांमुळे चिंता निर्माण झाली आहे.
baba vanga 2026 predictions
बाबा वेंगाचा २०२६ बद्दल इशारा : महायुद्ध, महाविनाश आणि मानवजातीसमोर AI चं संकटFile Photo
Published on
Updated on

baba vanga 2026 predictions third world war natural disaster threat AI humanity

पुढारी ऑनलाईन :

बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगाच्या 2026 सालाशी संबंधित भविष्यवाण्या सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. जन्मापासून नेत्रहीन असलेल्या या बुल्गेरियन भविष्यवक्त्याच्या भाकितांवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. असे म्हटले जाते की, त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि बराक ओबामा यांच्या विजयाची भविष्यवाणी खूप आधीच केली होती. चला तर जाणून घेऊया, नववर्ष 2026 बाबत बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या नेमके काय संकेत देतात.

baba vanga 2026 predictions
Gold price drop | नवीन वर्षात सोने प्रतितोळा दोन हजारांनी स्वस्त

मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाणारे AI

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची ताकद इतकी प्रचंड वाढेल की, ते मानवी नियंत्रणाच्या कक्षेबाहेर जाऊन स्वतः निर्णय घेऊ लागेल. याचा परिणाम केवळ उद्योग क्षेत्रांवरच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीवरही होईल. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवणे मानवाच्या क्षमतेपलीकडे जाऊ शकते. भविष्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते.

तिसरे महायुद्ध

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, जगाच्या पूर्वेकडील भागात निर्माण होणारा भू-राजकीय तणाव मोठ्या युद्धाचे रूप धारण करू शकतो. या युद्धाची झळ पश्चिमेकडील देशांनाही बसू शकते आणि तिथे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे जागतिक सत्तासंतुलन पूर्णपणे बदलू शकते. मात्र, रशियातील एखादा मोठा नेता ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो, असेही संकेत देण्यात आले आहेत.

baba vanga 2026 predictions
First Bullet Train : देशाची पहिली बुलेट ट्रेन लवकरच रुळावर; रेल्वेमंत्र्यांचे मोठे अपडेट

नैसर्गिक आपत्ती

बाबा वेंगा यांनी असेही भाकीत केले आहे की 2026 साली जगाला काही अत्यंत गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये पर्यावरणीय संकट, हवामान बदल, अतिवृष्टीमुळे पूर येण्याचा धोका, दुष्काळ तसेच भूकंप यांसारख्या घटनांचे संकेत दिले गेले आहेत.

आशियाची वाढती ताकद

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, आशिया खंड किंवा चीनसारखा एखादा देश अधिक शक्तिशाली म्हणून उदयास येईल, असे संकेत दिले आहेत. या भाकितांनुसार, 2026 साली चीनसारख्या देशाचा प्रभाव अधिक मजबूत होऊ शकतो. मात्र, त्याचवेळी या भागात संभाव्य वादविवाद व संघर्षाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. याशिवाय तैवान आणि दक्षिण चीनला काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

रशियात नव्या नेत्याचा वाढता प्रभाव

भविष्यवाणीनुसार, रशियात एखाद्या नव्या नेत्याचा प्रभाव वाढू शकतो. रशियाचा एखादा शक्तिशाली नेता संपूर्ण जगावर आपला दबदबा निर्माण करू शकतो. युद्ध आणि राजकीय उलथापालथीच्या काळात या नेत्याला मोठी ओळख मिळू शकते तसेच या काळात त्‍याचे महत्‍वही वाढू शकते.

एकूनच बाबा वेंगा यांनी याआधी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यामुळे लोकांमध्ये या वर्षातील भविष्यवाण्यांमुळे चिंता लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news