Climate Change Research : धोक्याची घंटा...! अंटार्क्टिकाने 'टिपिंग पॉइंट' ओलांडला? जाणून घ्या, नवीन संशोधन काय सांगते?

समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणातील वाढ चिंताजनक; विनाशकारी परिणामांसह कायमस्वरूपी बदल होण्याची शक्यता
Climate Crisis
अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्याच्या प्रमाणाने आता 'टिपिंग पॉइंट' (संतुलन बिघडण्याचा बिंदू) ओलांडला असण्याची शक्यता आहे.File Photo
Published on
Updated on

Antarctica's Tipping Point : अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्याच्या प्रमाणाने आता 'टिपिंग पॉइंट' (संतुलन बिघडण्याचा बिंदू) ओलांडला असण्याची शक्यता आहे. यामुळे संभाव्य विनाशकारी परिणामांसह कायमस्वरूपी बदल होऊ शकतात, असे नवीन संशोधनात नमूद करण्यात आले आहे. अंटार्क्टिका कदाचित परत न येण्याच्या हवामानातील टप्प्यावर पोहोचला असावा, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.२०१८ पासून समुद्रातील बर्फाची निर्मिती अचानक मोठ्या प्रमाणात घटली आहे. जाणून घेऊया, नेमका हा बदल कसा घडतो आहे याविषयी...

अंटार्क्टिकावर गेल्या सात वर्षांतील नेमके कोणते बदल दिसले?

'न्यू सायंटिस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक दशकांपासून जागतिक तापमान वाढत असतानाही अंटार्क्टिकामधील समुद्रातील बर्फाची पातळी तुलनेने स्थिर होती. मात्र, २०१६ मध्ये यात अचानक बदल झाला आणि समुद्रातील बर्फाचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले.फेब्रुवारी २०२३ मध्ये अंटार्क्टिकामधील समुद्रातील बर्फाने आतापर्यंतची सर्वात कमी पातळी गाठली. गेल्या सात वर्षांतील उन्हाळ्यातील बर्फाची ही तिसरी विक्रमी घट होती. तसेच, सप्टेंबर २०२३ मध्येही या समुद्रातील बर्फाची कमाल पातळी विक्रमी कमी नोंदवली गेली आहे.

Climate Crisis
अंटार्क्टिका मधील बर्फाखाली सापडल्या जीवांच्या ७७ प्रजाती

लंडनच्‍या रॉयल सोसायटीमध्‍ये कोणत्‍या विषयांवर झाली चर्चा?

हवामान मॉडेल्सने (Climate Models) खूप आधीच अंटार्क्टिकामध्ये समुद्रातील बर्फ कमी होण्याचा वेग वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. परंतु, २०१६ पासूनच्या या घटीचा वेग आणि प्रमाण पाहून हवामान शास्त्रज्ञही चकित झाले आहेत. या अचानक झालेल्या बदलाचे स्पष्टीकरण देण्यासाठी संशोधक धावपळ करत आहेत. नुकतीच लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये (Royal Society) या बदलांमुळे हवामानाचा 'टिपिंग पॉइंट' गाठला गेला आहे का, यावर चर्चा करण्यासाठी शास्त्रज्ञांची बैठक झाली.

image-fallback
अंटार्क्टिकाचा शोध पाश्‍चात्त्यांच्या आधी ११०० वर्षांपूर्वीच लागला ?

बर्फ वितळण्‍याचा वेग का वाढला?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील (University of California), लॉस एंजेलिसच्या मर्लिन राफेल यांच्या मते, हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे ही अचानक झालेली घसरण स्पष्ट करता येत नाही. समुद्रातील बर्फाच्या मोजमापासाठी उपग्रह रेकॉर्ड (Satellite Record) १९७९ मध्ये सुरू झाला. राफेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंटार्क्टिकामधील वेधशाळेतील जुना डेटा वापरून ही टाइम सीरिज २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वाढवली. त्यांच्या निष्कर्षांनुसार, केवळ ऐतिहासिक माहितीच्या आधारे २०२३ मध्ये समुद्रातील बर्फाचे इतके कमी होणे हे एका टक्क्यांहूनही कमी संभवनीय होते. आम्ही आ खऱ्या अर्थाने समुद्रातील बर्फाचे अत्यंत टोकाचे वर्तन पाहत आहोत," असे त्यांनी रॉयल सोसायटीच्या बैठकीत सांगितले.

Climate Crisis
सिंगापूर ते अंटार्क्टिका फूड डिलिवरीचा महिलेने बनवला रेकॉर्ड, केला 30 हजार किमीचा प्रवास (पाहा व्हिडिओ)

पर्यावरणावर कोणते परिणाम होणार?

जर्मनीतील अल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूटमधील (Alfred Wegener Institute) अलेक्झांडर हॉमन यांच्या मते, बर्फ निर्मितीतील अचानक झालेल्या घसरणीत हवामानातील 'टिपिंग पॉइंट'ची सर्व लक्षणे आहेत. हा बदल अचानक झाला आहे, तो संपूर्ण खंडावर परिणाम करत आहे आणि अंटार्क्टिकाच्या व्यापक हवामान तसेच पर्यावरणावर त्याचे मोठे परिणाम होतील. हॉमन यांनी 'न्यू सायंटिस्ट'ला सांगितले की, "संपूर्ण अंटार्क्टिक समुद्रातील बर्फ एका समग्र घटकाप्रमाणे प्रतिक्रिया देत आहे. आम्ही पाहत असलेले बदल हे दीर्घकाळ टिकणारे आहेत. ते प्रणालीमध्ये दीर्घकाळ राहतील असे दिसते आहे."

Climate Crisis
अंटार्क्टिकामधील सर्वात जास्त खोल भागाचा शोध

नवीन संशोधनात नेमकं काय आढळलं?

अंटार्क्टिकामध्ये, उष्ण, खोल महासागरातील पाणी सामान्यतः थंड, गोड्या पाण्याचे थर (Layer) वापरून पृष्ठभागावरील पाण्यापासून वेगळे ठेवले जाते. परंतु, हॉमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, २०१५ पासून दक्षिण महासागरातील (Southern Ocean) वाऱ्याचा वेग आणि पाण्याची क्षारता (Salinity) यात झालेल्या बदलांमुळे हा थर लक्षणीयरीत्या कमकुवत झाला आहे. हॉमन यांचे म्‍हटलं आहे की, "समुद्रातील बर्फ प्रणालीवर झालेला एक अतिरिक्त बदल यासाठी जबाबदार आहे. नवीन संशोधनातून असे सूचित होते की, समुद्राच्या उष्ण होत असलेल्या पाण्यामुळे ही अचानक घट झाली आहे. मानवी गतिविधीमुळे वातावरणात अडकलेल्या अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे ९० टक्के उष्णता जगातील महासागरांनी शोषून घेतली आहे. उष्ण, खोल महासागरातील पाण्याचे प्रमाण पृष्ठभागावर जास्त वेगाने वाढत आहे, ज्यामुळे बर्फ कमालीच्‍या वेगाने वितळत आहे.

Climate Crisis
अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली पाण्याचे भांडार

कोणत्‍या कारणांमुळे बर्फाच्‍या निर्मितीला मर्यादा

हवामान बदलांमुळे हे खोल महासागरातील पाणी उष्ण होत आहे. हॉमन यांचा इशारा आहे की, हवामान प्रणालीतील नैसर्गिक बदलांमुळे महासागराच्या क्षारता आणि वाऱ्यांमध्ये बदल झाले असतील, पण यामुळे खोल समुद्राच्या पाण्यात साठलेल्या मानव-निर्मित तापमानवाढीचे परिणाम आता बाहेर पडत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, उष्ण महासागराच्या पाण्याचा परिणाम आता अंटार्क्टिकावर जाणवत आहे, ज्यामुळे नवीन समुद्रातील बर्फाची निर्मिती मर्यादित होत आहे. सध्याच्या पाण्याच्या प्रवाहातील बदल केवळ गोड्या पाण्याचा मोठा स्रोत (जसे की मोठा हिमनदी वितळणे) दक्षिण महासागराच्या क्षारतेमध्ये अचानक बदल घडवून आणू शकल्यास किंवा उष्ण पाण्याचे प्रमाण कमी झाल्यासच उलटवले जाऊ शकतात. परंतु, भविष्यातील प्रणालीचा प्रतिसाद अत्यंत अनिश्चित आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

बर्फ वितळण्‍याचा वेगाचा समुद्र पातळीवर काय परिणाम होणार?

अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्‍याच्‍या प्रमाणात झालेल्‍या बदलांचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात. अंटार्क्टिकाचा समुद्रातील बर्फ जमिनीवरील हिमनदी आणि बर्फाच्या चादरींना स्थिर ठेवण्यास मदत करतो. समुद्रातील पुरेशा बर्फाच्या निर्मितीशिवाय त्यांच्या वितळण्याचा वेग वाढेल. यामुळे जागतिक समुद्र पातळीत अत्यंत वाढ होण्याची क्षमता आहे. एका अंदाजानुसार, अंटार्क्टिक बर्फाच्या चादरीत इतके पाणी आहे की, ते जागतिक समुद्र पातळी ५८ मीटरने वाढवू शकते.अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचा नाश झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची चमक कमी होईल, कारण पांढऱ्या बर्फापेक्षा गडद महासागराचे पाणी सूर्याची अधिक उष्णता शोषून घेते. यामुळे तापमान वाढ होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news