लंडन ः पाश्चात्त्य लोकांनी सन 1820 मध्ये दक्षिण ध—ुव म्हणजेच अंटार्क्टिकाचा शोध लावला असे मानले जाते. मात्र, त्यापूर्वीच 1100 वर्षे आधी पोलिनेशियन लोकांनी पृथ्वीच्या या दक्षिण टोकाला भेट दिलेली होती असे आता एका नव्या संशोधनातून आढळले आहे.
एका पोलिनेशियन साहसवीराने सूर्यप्रकाश पोहोचू न शकणार्या, बर्फाळ व डोंगराळ भागाचा प्रवास केल्याच्या अनेक दंतकथा आहेत. या दंतकथांचा न्यूझीलंडमधील संशोधकांनी मागोवा घेतला. तत्संबंधी काही हस्तलिखिते आणि चित्रेही त्यांनी शोधून काढली. त्यावरून असे दिसून आले की 1820 मध्ये पाश्चात्त्य लोकांनी अंटार्क्टिका शोधण्यापूर्वीच एक हजारपेक्षाही अधिक वर्षांपूर्वी पोलिनेशियन साहसवीरांनी या ध—ुवाचा प्रवास केला होता. पॅसिफिक महासागरातील पोलिनेशिया बेटांवरील हे लोक अतिशय धाडसी दर्यावर्दी होते.