Ales Bialiatski : नोबेल शांतता पुरस्कार विजेते एलेस बियालियात्स्की यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; जाणून घ्या काय आहे कारण

नोबेल शांतता पुरस्कार विजेते एलेस बियालियात्स्की यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; जाणून घ्या काय आहे कारण
Ales Bialiatski
नोबेल शांतता पुरस्कार विजेते एलेस बियालियात्स्की यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; जाणून घ्या काय आहे कारण Ales Bialiatski
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेलारशियनच्या मिन्स्कमधील लेनिन्स्की जिल्हा न्यायाललयाने शुक्रवारी (दि.३) नोबेल शांतता पारितोषिक विजेते एलेस बियालियात्स्की यांना १० वर्ष तुरुंगवास आणि सुमारे ६५,००० डॉलर दंडाची शिक्षा सुनावली आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार अनोंदणीकृत असलेल्या वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रमुख एलेस बियालियात्स्की (Ales Bialiatski) यांच्यावर नोंदवलेल्या फौजदारी आरोपांमध्ये दोषी आढळले आहेत. जाणून घ्या, एलेस बियालियात्स्की यांच्यावर काय आहेत आरोप.

Ales Bialiatski : २०२२ चा शांतता नोबेल पुरस्कार

मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. २०२२ चा शांतता नोबेल पुरस्कार बेलारूसमधील मानवाधिकार वकिल एलेस बियालियात्स्कीसह रशियन मानवाधिकार संघटना 'मेमोरियल' आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना 'सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज' यांना मिळाला होता. ऑस्लो येथील नॉर्वेजियन नोबेल इन्स्टिट्यूटमध्ये येथील कार्यक्रमात नोबेल समितीने याची घोषणा केली. हा पुरस्कार मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांच्या अथक प्रयत्नांवर प्रकाश टाकणारा असून संघर्ष टाळण्यासाठी आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एलेस बिलियात्स्की आणि रशियन-युक्रेनियन संघटनांचा गौरव करण्यात आल्याचे नोबेल समितीने सांगितले. अॅलेस बिलियात्सकी यांनी १९८० च्या सुमारास बेलारुसमध्ये लोकशाही आंदोलनात त्यांचा वाटा महत्तवपूर्ण आहे. १९६६ मध्ये त्यांनी कैद्यांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणारी संस्था विआस्नाची स्थापना केली आहे.

बेलारूसमधील लोकशाही चळवळीचे एलेस बियालियात्स्की

बेलारूसमध्ये 1980 च्या दशकाच्या मध्यात लोकशाही चळवळीचा उदय झाला. एलेस बियालियात्स्की हे त्या चळवळीच्या आरंभकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांनी बेलारूसमध्ये लोकशाही आणि शांततापूर्ण विकासासाठी आपले जीवन समर्पित केले आणि ते सातत्याने मानवी हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करत राहिले. त्यांनी 1996 मध्ये विआस्ना (स्प्रिंग) या संस्थेची स्थापना केली. राजकीय कैद्यांवर पोलिस आणि सरकारी अधिकार्‍यांकडून केलेल्या छळाचा दस्तऐवजीकरण आणि निषेध करण्यात 'विआस्ना'ने कायदेशीर लढा उभारला. सरकारी अधिकाऱ्यांनी वारंवार एलेस बियालियात्स्की यांचा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी 2020 पासून, ते आतापर्यंत बियालियात्स्की यांना कोणत्याही ट्रायल खेरीज ताब्यात घेण्यात आले आहे. प्रचंड वैयक्तिक त्रास सहन करूनही बेलारूसमधील मानवाधिकार आणि लोकशाहीसाठीच्या लढ्यासाठी बियालियात्स्की यांनी एक इंचही माघार घेतलेली नाही.

Ales Bialiatski : एलेस बियालियात्स्की यांच्यावरील आरोप?

सध्या बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को आहेत. ते १९९४ पासून सत्तेवर आहेत. २०२२ मध्ये पुन्हा सत्तेवर आले. दरम्यान एलेस बियालियात्स्की यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्या विरोधात निदर्शने केली गेली होती. यात सुमारे ३५,००० नागरिकांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या लोकांची सुटका होण्यासाठी त्यांनी वकिलांना जे पैसे दिले ते, निदर्शने करण्यासाठी त्यांनी परदेशातून आणले, असा आरोप केला होता. या कारणास्तव एलेस बियालियात्स्की यांच्यासह स्टेफानोविच आणि व्लादिमीर लॅबकोविच या दोघांवर हा आरोप ठेवला होता. या प्रकरणात एलेस बियालियात्स्की यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना ६५,००० डॉलर दंडासह १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

एलेस बियालियात्स्की यांच्या शिक्षेवर टीका

एलेस बियालियात्स्की यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका केली जात आहे. निर्वासित बेलारशियन विरोधी पक्षनेते स्वीयातलाना त्सिखानौस्काया यांनी एलेस बियालियात्स्की यांच्या शिक्षेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, " मानवाधिकार रक्षकांना आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यात नोबेल शांतता पारितोषिक विजेते एलेस बियालियात्स्की यांचा समावेश आहे. हे भयावह आहे. एलेस बियालियात्स्की यांनी अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. तो बेलारूसचा खरा नायक आहे." तर यूएन मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी म्हटले आहे की एलेस बियालियात्स्की चार अधिकार रक्षकांच्या शिक्षेमुळे ते चिंतित आहेत.

एलेस बियालियात्स्की चार अधिकार रक्षकांच्या शिक्षेने बेलारशियामध्ये ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news