Smartphone Ban : स्मार्टफोन दिसला तर थेट फोडणार! तालिबानचा अफगाणिस्तानात नवा फतवा

महिलांच्या आंदोलनांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तालिबानचा मोठा निर्णय
Smartphone Ban
Smartphone Ban : स्मार्टफोन दिसला तर थेट फोडणार! तालिबानचा अफगाणिस्तानात नवा फतवाfile photo
Published on
Updated on

afghanistan taliban ban smartphone afghans destroying mobile phone

पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने आणखी एक कठोर निर्णय घेत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे. नव्या आदेशानुसार, कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी स्मार्टफोन वापरताना आढळल्यास त्याचा फोन तत्काळ फोडला जाईल. तसेच त्याच्यावर कायदेशीर आणि शरिया कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

Smartphone Ban
iran israel war: अत्याधुनिक रणसंग्रामाचा थरार

हा आदेश तालिबानच्या लष्करी न्यायालयांकडून जारी करण्यात आला आहे. आदेशानुसार उच्चपदस्थ अधिकारी, सामान्य कर्मचारी तसेच मुजाहिदीन यांनाही स्मार्टफोन ठेवण्याची किंवा वापरण्याची परवानगी नाही. विशेष सूट हवी असल्यास तालिबानचे सर्वोच्च नेते हिबातुल्लाह अखुंदझादा यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल.

ब्रिटिश वृत्तसंस्था द गार्डियनच्या अहवालानुसार, सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये तालिबानचे अधिकारी हा आदेश वाचून दाखवत असून नागरिकांचे मोबाईल फोन फोडताना दिसत आहेत. मात्र, याबाबत तालिबानने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

संपूर्ण देशात एकसारखी अंमलबजावणी नाही

अहवालानुसार, ही बंदी सध्या संपूर्ण अफगाणिस्तानात एकसारख्या पद्धतीने लागू करण्यात आलेली नाही. काही भागांमध्ये ती केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित आहे, तर काही प्रांतांमध्ये महिलांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत तिचा प्रभाव दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, तालिबान सध्या जनतेच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत आहे. भविष्यात संपूर्ण देशभर स्मार्टफोनवर बंदी घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास अफगाणिस्तान जगापासून आणखी अलिप्त होऊ शकतो, असेही ते म्हणतात.

Smartphone Ban
Afghanistan Air Strike Pakistan: पाकिस्तानच्या वर्मी घाव... नूर खान बेस ते रावळपिंडी; अफगाणिस्तानचा जबर एअर स्ट्राईक

इंटरनेटवरील निर्बंधांनाही विरोध

गेल्या काही महिन्यांत तालिबानने इंटरनेट आणि डिजिटल संवादव्यवस्थेवर नियंत्रण वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देशभरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. "अनैतिक सामग्री रोखण्यासाठी" हा निर्णय आवश्यक असल्याचे तालिबानने सांगितले होते.

मात्र, या निर्णयाचा व्यापार, बँकिंग, हवाई वाहतूक आणि आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे अखेर इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करावी लागली.

स्मार्टफोन बंदीमागील संभाव्य कारणे

विश्लेषकांच्या मते, स्मार्टफोनवरील निर्बंधामागे अनेक कारणे असू शकतात. अलीकडेच हेरात शहरातील महिलांच्या आंदोलनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. महिलां व मुलींच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते.

तालिबानच्या कारवाईत अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. या घटनांचे व्हिडिओ जगभर पोहोचल्यानंतर तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे माहितीचा प्रसार आणि सोशल मीडियावरील नियंत्रण वाढवण्यासाठी स्मार्टफोन बंदीचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news