Afganistan 6 year old bride | 6 वर्षांच्या बालिकेचे 45 वर्षीय पुरुषाशी लग्न; तालिबान म्हणाले- मुलगी 9 वर्षांची होईपर्यंत थांब...

Afganistan 6 year old bride | अफगाणिस्तानातील प्रकार; त्या पुरूषाला आधीपासूनच दोन पत्नी, सोशल मीडियात संताप
girl in burka file image
girl in burka file imagex
Published on
Updated on

Afganistan 6 year old bride Taliban

काबूल : अफगाणिस्तानात बालविवाहाची भीषण उदाहरणे दिवसेंदिवस समोर येत असून, दक्षिण अफगाणिस्तानातील मर्जाह जिल्ह्यात एका 45 वर्षीय पुरुषाने 6 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकास्थित अफगाण माध्यम Amu.tv च्या बातमीनुसार, मुलीच्या वडिलांनी आर्थिक अडचणींमुळे तिचे लग्न एका वयस्क पुरुषाशी लावून दिले. या पुरुषाच्या आधीपासून दोन पत्नी आहेत.

तालिबानचा हस्तक्षेप

या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असतानाच तालिबानने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्या मुलीला त्या पुरुषाच्या घरी नेण्यास रोखलं आहे. तालिबानने स्पष्ट सांगितले की, मुलीला नवऱ्याच्या घरी पाठवण्यासाठी किमान ती 9 वर्षांची होईपर्यंत वाट पाहावी लागेल.

मात्र, तालिबानकडून या संदर्भात कोणतेही औपचारिक वक्तव्य अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही.

सध्या ती मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे, अशी माहिती Hasht-e Subh Daily ने दिली आहे. या विवाहात 'वालवार' (वधूमूल्य) ही स्थानिक प्रथा पाळण्यात आली होती. यामध्ये वधूमूल्य मुलीच्या रूप, शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या आधारावर ठरवले जाते.

girl in burka file image
China mega dam | चीनच्या मेगा धरणाचा भारताला मोठा धोका; तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची उभारणी सुरु

सोशल मीडियात संताप

या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका वयस्क पुरुषासोबत एका लहान मुलीचे लग्न होत असल्याचे दृश्य पाहून अनेक युजर्सनी दु:ख, धक्का आणि संताप व्यक्त केला आहे. मानवाधिकार संघटनांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

अफगाणिस्तानात बालविवाहांची वाढती समस्या

2021 मध्ये तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवल्यानंतर देशात बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्त्रियांवर घालण्यात आलेले निर्बंध, विशेषतः मुलींवरील शिक्षणबंदी, ही या वाढीमागील एक प्रमुख कारणे आहे.

UN Women च्या अहवालानुसार, मुलींच्या शिक्षणावर बंदी आल्यामुळे बालविवाहात 25 टक्के आणि अल्पवयीन गरोदरपणाच्या प्रमाणात 45 टक्के वाढ झाली आहे. यामुळे मुलींच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

girl in burka file image
Balochistan Operation Baam | बलुच बंडखोरांचा पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणांवर हल्ला; 17 ठिकाणी घाव

मानवाधिकार संघटनांची मागणी

मानवाधिकार कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी जागतिक समुदायाला आवाहन केले आहे की, अशा घटनांवर त्वरित कारवाई करावी. बालविवाह ही केवळ मानवी हक्कांची पायमल्ली नाही, तर ती समाजाच्या आणि देशाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठीही घातक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news