Tablighi Jamaat : सौदी अरेबिया सरकारची तबलिगी जमात संघटनेवर बंदी

Tablighi Jamaat :  सौदी अरेबिया सरकारची तबलिगी जमात संघटनेवर बंदी

पुढारी ऑनलाईन :  तबलिगी जमात ( Tablighi Jamaat ) संघटनेवर सौदी अरेबिया सरकारने बंदी घातली आहे. दहशतवादाच्‍या प्रवेशव्‍दारांपैकी एक आणि समाजासाठी धोकादायक असल्‍याने तबलिगी जमात ( Tablighi Jamaat ) या संघटनेवर बंदी घालण्‍यात येत आहे, असे सौदी अरेबियाच्‍या इस्‍लामिक व्‍यवहार मंत्री डॉ. अब्‍दुललतीफ अल-अलेक यांनी ट्‍विटवर म्‍हटलं आहे.

सुन्‍नी मुस्‍लिमांची जगातील सर्वात मोठी संघटना असा दावा 'तबलिगी जमात' करते. अशा संघटनांमध्‍ये सामील होण्‍यापूर्वी विचार करा, असा इशारा सोदी अरेबिया सरकारने दिला आहे. यामुळे ही संघटना पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे.

२०२०मध्‍ये कोरोना संसर्गाच्‍या सुरुवातीच्‍या काळात भारतामध्‍ये दिल्‍लीत 'तबलिगी जमात'ने मरकझचे आयोजन केले होते. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात आल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटकही केली होती. काही दिवसानंतर या कार्यक्रमासाठी विदेशातून आलेल्‍या नागरिकांना मायदेशी जाण्‍यास परवानगी देण्‍यात आली होती.

तबलिगी जमात ही संघटनेत दक्षिण आशियातील सुमारे १५ ते २५ कोटी नागरिक जोडले केले आहेत. या संघटनेकडून भारतात भोपाळ, मुंबईतील नेरुळ, दिल्‍लीतील निजामुद्‍दीन, बांगलादेशमधील ढाका आणि पाकिस्‍तानमधील लाहौर नजीकच्‍या रायविंड शहराजवळ मरकझचे आयोजन केले जाते.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news