Israel-Hamas War : इस्रायलच्‍या हवाई हल्‍ल्‍यात हमासचा कमांडर ठार

इस्‍त्रायलच्‍या सैन्‍यदलाने गाझामध्‍ये केलेल्‍या हल्‍ल्‍यात हमासच्या नुखबा फोर्सेसमधील कमांडर अहमद हसन सलामे अलसौरका ठार झाला आहे.
इस्‍त्रायलच्‍या सैन्‍यदलाने गाझामध्‍ये केलेल्‍या हल्‍ल्‍यात हमासच्या नुखबा फोर्सेसमधील कमांडर अहमद हसन सलामे अलसौरका ठार झाला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रायलच्‍या सैन्‍यदलाने गाझामध्‍ये केलेल्‍या हल्‍ल्‍यात हमासच्या नुखबा फोर्सेसमधील कमांडर अहमद हसन सलामे अलसौरका ठार झाला आहे. सलामे हा ७ ऑक्‍टोबर रोजी इस्‍त्रायलवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात सहभागी होता, अशी माहिती इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) दिली आहे. या कारवाईत कोणतेही नागरिक जखमी झाले नाहीत, असेही आयडीएफने स्‍पष्‍ट केले आहे. ( Israel-Hamas War)

अहमद हसन सलामे याने आश्रय घेतलेल्‍या ठिकाणाची गोपनीय माहिती : इस्‍त्रायलच्‍या सैन्‍यदलास मिळाली होती. त्‍यानुसार इस्‍त्रायलच्‍या हवाई दलाने उत्तर गाझामधील बीट हानौन परिसरात आश्रय घेतलेल्‍या हमास दहशतवादी अहमद हसन सलामे अलसौर्काचा याला अचूक टिपले, या घटनेची माहिती IDF ने हल्‍ल्‍याचा व्हिडिओ शेअर Xवर पोस्‍ट करत दिली. ( Israel-Hamas War)

अलसौरका हा नुखबा फोर्सेसमधील कमांडर होता. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलमध्‍ये झालेल्‍या दहशतवादी
हल्‍ल्‍यात त्‍याचा सहभाग होता. या हल्‍ल्‍यात इस्‍त्रायलमधील १,१८९ नागरिक ठार झाले होते. आयडीएफने दावा केला आहे की ऑपरेशन दरम्यान नागरिकांची हानी कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आणि स्ट्राइकमध्ये कोणतेही नागरिक जखमी झाले नाहीत, असे आयडीएफने स्‍पष्‍ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news