Kuwait fire : कुवेत आगप्रकरणी तीन भारतीयांना अटक

Kuwait fire : कुवेत आगप्रकरणी तीन भारतीयांना अटक

दुबई,वृत्तसंस्था : कुवेतमधील नुकतेच एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी तीन भारतीय, चार इजिप्शियन आणि एका कुवेती नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. 12 जून रोजी पहाटे सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकूण 50 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 45 भारतीयांचा समावेश होता.

पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1.25 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल, असे कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी जाहीर केले आहे. नुकसानभरपाई विदेशी कामगारांच्या दूतावासाकडे दिले जातील आणि तेथून तेथून ते त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचतील. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीत 196 कामगार राहत होते. त्यापैकी बहुतेक भारतीय होते. आठ जणांना दोन आठवड्यांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. त्यांच्यावर निष्काळजीपणा, खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news