भारतातील सव्वादोन लाखांवर एक्स अकाऊंटवर बंदी

भारतातील सव्वादोन लाखांवर एक्स अकाऊंटवर बंदी

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : जगप्रसिद्ध उद्योगपती एलन यांची कंपनी एक्स कॉर्प कंपनीने 26 एप्रिल ते 25 मे या काळात भारतातील सुमारे 2,30, 892 अकाऊंटवर बंदी घातली आहे. यातील 2,29,995 अकाऊंट लहान मुलांचे शौषण आणि नग्नतेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली बंद केली आहेत; तर 967 अकाऊंट दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली हटविण्यात आली आहेत. नव्या आयटी नियमानुसार (2021) आपल्या महिन्याच्या अहवालात 'एक्स'ने म्हटले आहे की, 26 एप्रिल ते 25 रोजी या काळात कंपनीला एक्स युजर्सची सुमारे 17 580 तक्रारी आल्या होत्या.

यापूर्वी 26 मार्च ते 25 एप्रिल काळात एक्सने भारतातील जवळपास 1,84,241 अकाऊंटवर बंदी घातली होती. यातील 1,303 अकाऊंट दहशतवादाला खतपाणी घातल्याच्या कारणावरून हटविण्यात आली होती; तर 26 फेब्रुवारी ते 25 मार्च काळातील सुमारे 2,13,862 भारतीय एक्स अकाऊंटवर बंदी घातली होती. यातील जवळपास 1,235 अकाऊंट अशी होती की, जी भारतात दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून बंद केली होती. मस्क यांनी ट्विटर नाव आणि लोगो बदल्यानंतर आता त्याचा डोमेन बदलून एक्स-कॉम करण्यात आले आहे. सर्व मुख्य सिस्टीम आता एक्स.कॉम असेल, अशी माहिती मस्क यांनी एक्सवरून दिली होती.

सेटिंग कायम राहील

24 जुलै 2023 मध्ये मस्क यांनी ट्विटरचे नाव आणि लोगो बदलून एक्स केला होता. त्यावेळी एक्स.कॉमला ट्विटर.कॉमवर रिडायरेक्ट केली होते. पण, आया डोमेनला एक्स.कॉम करण्याबरोबरच ट्विटर.कॉमवर रिडायरेक्ट केले आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, की आम्ही आमचा युआरएल बदलत आहे; पण तुमचा खासगीपणा आणि डेटा संरक्षणचे सेटिंग तेच राहील, असा संदेश 'एक्स'च्या लॉगिन पेजच्या खाली दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news