Emojis : २०२१ मध्ये कोणती इमोजी सर्वात जास्त वापरली? | पुढारी

Emojis : २०२१ मध्ये कोणती इमोजी सर्वात जास्त वापरली?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आपल्या हातातला स्मार्टफोनमधील व्हाॅट्सअ‍ॅप किंवा तत्सम अ‍ॅप्स चर्चा किंवा संवादासाठी इतका महत्त्वाचा ठरला आहे की, त्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. आता संवाद साधत असताना टायपिंगद्वारे शब्दांचा आधार घेतला जातो. पण, मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘इमोजी’ (Emojis) नावाचा पार्ट खूप महत्त्वाचा ठरतो आहे.

२०२१ हे वर्ष आता सरत आलं आहे. या वर्षांत लोकांनी कोणत्या इमोजी वापरल्या, याचा एक सर्वे नुकताच आलेला आहे. त्यामध्ये आनंदाश्रू असणारा इमोजी सर्वांत जास्त वापरला गेला आहे, असं  म्हंटलेलं आहे. एकूण ऑनलाईन लोकसंख्येच्या ९२ लोकांनी ही इमोजी (Emojis) वापरलेली आहे. जवळपास ३६६३ इमोजी आहेत, त्यातील १०० इमोजी प्रामुख्याने वापरल्या जातात. आपण पाहू या की, या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये कोणत्या टाॅप १० इमोजी वापरल्या गेल्या…

Emojis

१) आनंदाश्रू इमोजी (Face with tears of joy) : या इमोजीमधून अत्यानंद दर्शविला जातो. यामध्ये आनंदाच्या भरात डोळ्यांतून अश्रू ओघळतात, असे दाखविण्यासाठी या इमोजीचा (Emojis) वापर केला जातो. २०२१ या वर्षभरात सर्वांत जास्त ही इमोजी वापरण्यात आली आहे.

Emojis

२) लाल हृद्य (Red heart) : या वर्षांत सर्वांत जास्त वापरली गेलेली आणि प्रेमाचं प्रतिक असणारी ही इमोजी दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्येदेखील दुसऱ्या क्रमांकावरच ही Red heart इमोजी होती.

Emojis

३) हसता-हसता जमिनीवर लोळणे (Rolling on the floor laughing) : एखादा विनोद झाला की, माणूस खूप हसतो… जमिनीवर पडून-पडून हसतो, त्याचंच हे प्रतिक म्हणून ही इमोजी वापरली जाते. या वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ही इमोजी आहे, जी सर्वांत जास्त वापरली गेली.

Emojis

४) सकारात्मक प्रतिक्रिया (Thumbs up) : आपण एखाद्याच्या बाजूने असणे किंवा एखाद्याच्या म्हणण्याला सकारात्मकता दर्शविण्यासाठी थंब्स अप (Thumbs up) इमोजी वापरली जाते. या वर्षांत चौथ्या क्रमांकावर ही इमोजी आहे.

Emojis

५) मोठ्याने रोडणे (Loudly crying face) : आपणाला कुणी रागावलं किंवा पालकांनी मारलं तर, ती मोठ्याने रडण्याची भावना व्यक्त करण्यासाठी ही इमोजी वापरली जाते. सध्या ही इमोजी ५ क्रमांकावर आहे. पूर्वी ही इमोजी ८ व्या स्थानी होती.

Emojis

६) नमस्कार किंवा आभार (Folded hands) : एखाद्याला नमस्कार करायचा असेल किंवा एखाद्याचे आभार मानायचे असतील, तर ही दोन्ही हात जोडल्याची इमोजी वापरली जाते. सध्या ती ६ क्रमांकावर आहे.

Emojis

७) चुंबनाचा चेहरा (Face blowing a kiss) : चुंबन घेतानाचा चेहऱ्याची ही इमोजी २०१९ मध्ये ९ क्रमांकावर होती. २०२१ मध्ये ७ व्या क्रमांकावर वापरली जाते आहे. लहान मुलांचा किंवा प्रेयसीचे चुंबन घ्यायची भावना दर्शवायची असेल तर ही इमोजी प्रामुख्याने वापरली जाते.

Emojis

८)  मनापासून हसणारा चेहरा (Smiling face with hearts) : २०१९ मध्ये १६ व्या स्थानी असणारी ही इमोजी यंदाच्या वर्षी ८ व्या स्थानी आली आहे. लोकांकडून सर्वांत जास्त ही इमोजी यावर्षी वापरली गेली आहे.

Emojis

९) डोळ्यांतून प्रेम व्यक्त करणारा चेहरा (Smiling face with heart-eyes) : ही इमोजी २०१९ मध्ये ३ क्रमांकावर होती. पण, यावर्षी ही इमोजी ९ व्या क्रमांकावर आली आहे.

Emojis

१०) हसता चेहरा आणि हसते डोळे (Smiling face with smiling eyes) : या वर्षी सर्वात कमी वापरली गेलेली ही इमोजी आहे. २०१९ मध्ये ५ व्या क्रमांकावर होती, सध्या ती १० क्रमांकावर आलेली आहे.

Back to top button