रईसींचा मृत्यू घात की अपघात?

रईसींचा मृत्यू घात की अपघात?

तेहरान; वृत्तसंस्था : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व नऊजणांची अंत्ययात्रा ताब्रिझ शहरातून काढण्यात आली. लाखो लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये पाच दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

गुरुवारी अंत्यविधी

गुरुवारी मशहद शहरात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. हे शहर रईसींचे जन्मगाव आहे.

 'मोसाद'चा बालेकिल्ला

रईसींचा अपघाती मृत्यू झाला, ते ठिकाण इस्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर संघटनेचा बालेकिल्ला मानले जाते. अझरबैजान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याचे ठिकाण यांच्यातील एक सूत्र ही घटना हत्या असू शकते, या संशयाला जन्म घालणारी आहे.

 अझरबैजानवर सुई

इराणला लागून असलेल्या अझरबैजान या देशाशी इराणचे संबंध ताणलेले आहेत. इस्रायलशी मैत्री असलेला अझरबैजान हा मध्य आशियातील एकमेव मुस्लिम देश आहे. त्यामुळे अझरबैजानवरही संशयाची सुई आहेच. रईसींचे हेलिकॉप्टर ज्या दुर्गम डोंगराळ भागात कोसळले त्या भागात 'मोसाद'चे अनेक गुप्तहेर सक्रिय असतात. अझरबैजानमध्ये राहून इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून इराणने गेल्यावर्षी एका महिलेसह चारजणांना फाशी दिली होती. सध्या इराणकडून या अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात असले, तरी वरील अँगलचे सावट या अंदाजावर आहेच. रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशीही सुरू झाली आहे. इराणच्या सशस्त्र दलाचे चिफ ऑफ स्टाफ जनरल मोहम्मद बगेरी यांनी त्यासाठी इराणचे ब्रिगेडियर अली अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समितीही नेमली आहे.

संघर्षाचे भय गडद

रईसींच्या मृत्यूनंतर इराणमधील धार्मिक नेते आणि सैन्य यांच्यात संघर्षाची भीती अधिक गडद झालेली आहे. इस्लामिक क्रांतीनंतर, सत्तेची सूत्रे कोणाकडे ते इराणमध्ये मुख्यत्वे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनीच ठरवतात. याउपर 28 जून रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. नामांकन 20 जूनपासून सुरू होणार आहे. इराणी राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्षांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास, देशाचे उपराष्ट्रपती हे पद स्वीकारतात. नंतर पुढील 50 दिवसांत देशात निवडणुका होतात. मोहम्मद मुखबर हे हंगामी राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. मुखबर यांनी इराणी विशेष दूत म्हणून भारतात एक काळ घालविलेला आहे, हे येथे उल्लेखनीय!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news