China Flood : चीनमध्ये आज येणार शतकातील सर्वांत मोठा महापूर?

File Photo
File Photo

बीजिंग : वृत्तसंस्था : चीनमध्ये सोमवारी शतकातील सर्वांत मोठा महापूर येण्याची शक्यताराष्ट्रीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तत्पूर्वी दक्षिण चीनच्या किनारपट्टीवरील भागांत वादळ धडकणार असल्याचा रेड अलर्ट जारी झाला आहे.

महापुरामुळे १२ कोटी लोकांना फटका बसण्याची शक्यता गृहित धरून लष्कर तैनात ठेवण्यात आले आहे. किंगयुआन शहरात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराची शक्यता गृहित धरून २० हजार लोकांना हलविण्यात आले आहे. भूस्खलनाच्या ६५ घटना रविवारी गुआंग्शीतील हेझोऊ शहरात भूस्खलनाच्या ६५ घटना घडल्या. गुआंग्डोंगमध्ये १८ एप्रिलपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्ल नदीने काठ ओलांडला असून, वस्त्यांत पाणी शिरले आहे. अनेक अपार्टमेंटस् पाण्याखाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news