व्हिएतनाममध्‍ये अब्जाधीश महिलेला भ्रष्‍टाचारप्रकरणी सुनावली फाशी

व्‍हिएतनाममधील बांधकाम व्‍यावसायिक टुओंग माय लॅन हिला देशातील सर्वात मोठ्या घोटाळा प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे.
व्‍हिएतनाममधील बांधकाम व्‍यावसायिक टुओंग माय लॅन हिला देशातील सर्वात मोठ्या घोटाळा प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : व्‍हिएतनाममधील बांधकाम व्‍यावसायिक टुओंग माय लॅन हिला देशातील सर्वात मोठ्या भ्रष्‍टाचार प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे. सुमारे 27 अब्ज डॉलर्सचा (2 लाख 22 हजार 300 कोटी रुपये) हे भ्रष्‍टाचार प्रकरण आहे. व्‍हिएतनाम देशाच्‍या इतिहासातील हा सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक आहे.

व्हॅन थिन्ह फाटच्या  बांधकाम कंपनीच्‍या ६७ वर्षीय टुओंग माय लॅन ट्रुओंग माई लॅन या अध्‍यक्षा आहेत. देशातील सर्वात मोठी विकसक कंपनी अशीही त्‍यांच्‍या कंपनीची ओळख होती. एक दशकाहून अधिक काळ सायगॉन कमर्शियल बँक (SCB) च्या निधीची उधळपट्टी केल्याबद्दल दोषी आढळल्‍या. तीन ज्युरर्स आणि दोन न्यायाधीशांच्या पॅनेलने लॅनच्या बचावाचे सर्व युक्तिवाद नाकारले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. लॅन व्यतिरिक्त, लाच घेणे, सत्तेचा गैरवापर, फसवणूक आणि बँकिंग कायद्याचे उल्लंघन यांसारख्या आरोपांवरून इतर 85 जणांविरुद्धही निकाल देण्यात आला आहे.

लॅन हिच्‍या व्‍हॅन थिन्‍ह फाट या रिअल इस्‍टेट कंपनीवर १२ अब्‍ज डॉलर्सची फसवणूक केल्‍याचा आरोप होता. हा घोटाळा देशाच्‍या सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍नाच्‍या सुमारे ३ टक्‍के इतका होता, असे वृत्त 'असोसिएटेड प्रेस'ने व्हिएतनामच्या थान्ह निएनचा हवाल्‍याने दिले आहे. व्‍हिएतनाममध्‍ये २०१२ ते २०२२ या काळात लॅन हिने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन सायगॉन जॉइंट स्टॉक कमर्शियल बँकेवर बेकायदेशीरपणे नियंत्रणठेवल्‍याचाही आरोप आहे. २०२२ मध्‍ये देशात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत लॅन याला झालेली अटक ही सर्वात हायप्रोफाइल कारवाई ठरली होती.

भ्रष्‍टाचार प्रकरणी फाशीची शिक्षा

लॅन हिला झालेली फाशीची शिक्षा ही व्हिएतनाममध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा हा एक भाग मानला जात आहे. या मोहिमेत अनेक अधिकारी आणि व्यापारी जगतातील लोकांना अटक करण्यात आली आहे.व्हिएतनाममधील भ्रष्टाचाराविरुद्ध हे प्रकरण महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मागील महिन्‍यात व्हो व्हॅन थुओंग यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत अडकल्यानंतर राजीनामा दिला. व्हॅन थिन्ह फाट ही व्हिएतनामच्या सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. त्यांच्या नावावर आलिशान निवासी इमारती, कार्यालये, शॉपिंग सेंटर्स आणि हॉटेल्स यांचा समावेश आहे.मागील वर्षी सुमारे 1,300 मालमत्ता कंपन्यांनी व्हिएतनामच्या रिअल इस्टेट मार्केटमधून माघार घेतली, यामुळे या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news