धक्‍कादायक : पत्नीची हत्या करून केले 224 तुकडे

धक्‍कादायक : पत्नीची हत्या करून केले 224 तुकडे

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनमध्ये एकाने पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे 224 तुकडे केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटना मार्च 2023 मधली आहे. हत्येच्या एक वर्षानंतर निकोलस मेटसन याने कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. निकोलसने (वय 28) पत्नी हॉली ब्रेमली (वय 26) हिच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे काही दिवस घरात ठेवले. त्याने ते बाहेर फेकण्यासाठी मित्राला 5 हजार रुपये दिले.

पत्नीला मारल्यास काय फायदे होतील? मरणानंतर ती घाबरवेल काय? याबाबतची माहिती निकोलस याने इंटरनेटवर सर्च केली होती हे विशेष! हॉलीच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत असल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले आहे, दोघेही घटस्फोट घेणार होते. हॉली बेपत्ता झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी निकोलसला पत्नीबाबत विचारणा केली. यावर त्याने ती कदाचित बेडच्या खाली लपली असावी, असे निकोलसने उत्तर दिले होते. घरातून दुर्गंधी आल्यानंतर निकोलसला पोलिसांनी अटक केली आणि नदीतून हॉलीच्या शरीराचे 224 तुकडे सापडले.

फ्रिजमध्ये ठेवले शरीराचे काही भाग

एका पॉलिथिन पिशवीत हात तर दुसर्‍या पिशवीत डोके मिळाले होते. डोक्यावर मात्र केस नव्हते. घरातील मोठ्या फ्रिजमध्ये दोन पिशव्या मिळाल्या होत्या. अजूनही हॉलीच्या शरीराचे काही भाग मिळाले नसून रक्ताचे डाग पुसण्यासाठी निकोलसने अमोनियाचा वापर केला होता, असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news