इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून मिळणारे वेतन घेण्यास नकार दिला आहे. अठरा दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर पाकच्या अन्य केंद्रीय मंत्र्यांनीही वेतन न घेण्याची घोषणा केली आहे
पाकिस्तानी पंतप्रधानांना दरमहा दोन लाख रुपये वेतन असून राष्ट्राध्यक्षांचे वेतन दरमहा सुमारे 8 लाख 46 हजार पाकिस्तानी रुपये आहे. देशाची आर्थिक स्थिती पाहता आर्थिक व्यवस्थापन आणि राष्ट्रीय महसुलावर बोजा नको म्हणून वरीलप्रमाणे सर्वांनी वेतन न घेण्याचे ठरविले आहे. दीड महिना आयातीसाठी पुरेल एवढाच परकीय चलन साठा (8 अब्ज डॉलर) पाककडे शिल्लक आहे. इतका आहे, जो सुमारे दीड महिन्याच्या वस्तूंच्या आयातीइतका आहे. सध्या एका डॉलरची किंमत 276 पाकिस्तानी रुपये एवढी आहे. आणखी एका निर्णयानुसार इथून पुढे पाकिस्तानमधील कोणत्याही सरकारी कार्यक्रमात रेड कार्पेटचा वापर केला जाणार नाही. आता केवळ परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठीच रेड कार्पेट अंथरले जाणार आहे.