Italy PM Giorgia Meloni Deepfake Video : इटलीच्या पंतप्रधानांचा डीपफेक पोर्न व्हिडिओ, मेलोनी यांनी मागितली १ लाख युरोची नुकसान भरपाई | पुढारी

Italy PM Giorgia Meloni Deepfake Video : इटलीच्या पंतप्रधानांचा डीपफेक पोर्न व्हिडिओ, मेलोनी यांनी मागितली १ लाख युरोची नुकसान भरपाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डीपफेक व्हिडिओ प्रकरणी १ लाख युरो नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (Italy PM Giorgia Meloni Deepfake Video) इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा डीपफेक व्हिडिओ २०२२ मध्ये ऑनलाईन प्रसारीत झाला होता. आरोपींनी एडल्ट स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया यांचा चेहरा लावून ऑनलाईन प्रसारीत केला होता. आरोपींनी मेलोनी यांचा चेहरा दुसऱ्या स्टारच्या चेहऱ्यावर लावून अश्लिल व्हिडिओ बनवले आणि नंतर ते इंटरनेटवर अपलोड केले होते. (Italy PM Giorgia Meloni Deepfake Video)

४० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या ७३ वर्षीय वडिलांसोबत मिळून मेलोनी यांचा हा व्हिडिओ अमेरिकन एडल्ट कॉन्टेंट वेबसाईटवर पोस्ट केला होता. BBC च्या माहितीनुसार, आरोपींनी मेलोनी पंतप्रधान होण्याआधी २०२२ मध्ये डीपफेक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये एडल्ट चित्रपट स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जियाचा चेहरा लावण्यात आला होता. दोन्ही आरोपींवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वापरल्या गेलेल्या स्मार्टफोनचा तपास करून आरोपींना शोधण्यात यश आले. विशेष म्हणजे, इटलीमधील मानहानीची काही प्रकरणे फौजदारी असू शकतात आणि परिणामी त्या प्रकणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मेलोनी २ जुलै रोजी न्यायालयात साक्ष देतील. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, हे व्हिडिओ युनायटेड स्टेट्समधील एका अश्लील वेबसाइटवर अपलोड केले गेले होते आणि काही महिन्यांत लाखो वेळा पाहिले गेले.

मेलोनी रक्कम दान करणार

मेलोनी यांच्या वकील टीमने सांगितले की, पंतप्रधान जी भरपाई मागत आहेत, ती प्रतिकात्मक आहे. अशा गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिलांनी आवाज उठवण्यास घाबरू नये, हा संदेश या नुकसानभरपाईचा आहे. भरपाई मिळाल्यास, ती रक्कम हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी निधीमध्ये देण्यात येईल.

 

 

 

 

Back to top button