समान आडनावाचा कायदा रद्द करा; जोडप्यांची मागणी : सुप्रीम कोर्टात याचिका

समान आडनावाचा कायदा रद्द करा; जोडप्यांची मागणी : सुप्रीम कोर्टात याचिका

टोकिओ; वृत्तसंस्था : जपानमध्ये लग्नानंतर समान आडनाव ठेवण्याचा कायदा आहे. या कायद्याविरोधात सहा जोडप्यांनी जपान सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे. या कायद्यामुळे त्रास होत असून विशेषतः महिलांना आपले वैयक्तिक करिअर पुढे नेण्यासाठी अडचणीत येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

समान आडनाव ठेवण्याचा हा कायदा जपानमध्ये पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी केला जात आहे. लग्नानंतर महिलांना विविध कायदे आणि व्याववसायिक नावामुळे अनेक मूलभूत सेवा आणि सुविधांचा लाभ उठवण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. घटस्फोट झाल्यानंतरही महिलांना मुलांचा ताबा मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. खरे तर जपानमधील या कायद्याच्या विरोधात यापूर्वी दोनवेळा याचिका दाखल केल्या होत्या. पण त्या फेटाळून लावल्या होत्या. पण यावेळी अनेक बड्या कंपन्यांतील मॅनेजर पदावर असलेल्यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी केली असून विवाहित जोडप्यांकडे अनेक आडनावांचे पर्याय उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news