फ्रान्समध्ये गर्भपात आता घटनात्मक अधिकार | पुढारी

फ्रान्समध्ये गर्भपात आता घटनात्मक अधिकार

पॅरिस : फ्रान्सच्या संसदेने मंगळवारी गर्भपाताला घटनात्मक अधिकार म्हणून घटनेत समाविष्ट करून ऐतिहासिक निर्णय घेतला. संसदेत या प्रस्तावाच्या बाजूने ७८० खासदारांनी मतदान केले तर विरोधात ७२ जणांनी मतदान केले.

संसदेत दोन्ही बाजूंनी घमासान चर्चा झाल्यानंतर मतदान पार पडले. या निर्णयानंतर पंतप्रधान गॅब्रियल अॅटल यांनी महिलांना उद्देशून तुमच्या शरीरावर फक्त तुमचाच अधिकार आहे, इतर कुणाचा नाही असे सांगत संसदेच्या या निर्णयाचे स्वागत केले.

Back to top button