भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसाला शिक्षा नाहीच | पुढारी

भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसाला शिक्षा नाहीच

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या सिएटलमध्ये भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कमडुला हिच्या मृत्यूला कारणाभूत ठरलेला पोलिस अधिकारी केव्हिन डेव्ह याच्यावर खटला चालवला जाणार नाही, अथवा त्याला शिक्षा होणार नाही. केव्हिनविरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 24 जानेवारी रोजी पोलिसांच्या मोटारीला धडक होऊन जान्हवीचा मृत्यू झाला होता. मोटार केव्हिन चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. केव्हिनसोबत मोटारील डॅनिअल ऑडेरर नावाचा पोलिस अधिकारी होता. त्याने हसत-हसत जान्हवीच्या मृत्यूची खिल्ली उडवली होती.

अपघाताचा एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप समोर आली आहे आणि यामध्ये भारतीय विद्यार्थिनी जान्हवीच्या जीवनाचे काही मोल नसल्याचे डॅनिअल म्हणत असल्याचे दिसत आहे. त्याच्या शरीरावर असलेला कॅमेरा सुरू होता. यामध्ये सर्व काही रेकॉर्ड झाले होते.

Back to top button