2800 कोटी रुपये जिंकले; पण, लॉटरी कंपनीने हात वर केलं | पुढारी

2800 कोटी रुपये जिंकले; पण, लॉटरी कंपनीने हात वर केलं

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील जॉन चीक्स नामक एकाने पॉवर बॉलमध्ये तब्बल 350 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 2800 कोटी रुपये जिंकले. यानंतर त्याचा या घटनेवर विश्वासच बसेना. तो पॉवर बॉलच्या कार्यालयात गेला आणि तिथे त्याने आपले विजेते तिकीट दाखवले. पण, हाय रे दैवा! कंपनीने चक्क हात वर केले.

संबंधित बातम्या 

आम्ही चुकीचे क्रमांक प्रसिद्ध केले, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे चीक्सच्या पदरी निराश पडली असली तरी त्याने हार मानलेली नाही. कंपनीविरोधात त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनीने म्हटले आहे की, तांत्रिक चुकीमुळे आम्ही चीक्स यांना जॅकपॉटची रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळे चीक्स यांची नजर आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लागली आहे. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे अमेरिकेन लॉटरीच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का पोहोचला आहे.

Back to top button