Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान हादरले; ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान हादरले; ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तान आज (दि.१८)  पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. अफगाणिस्तानमध्ये आज दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती, तर केंद्रबिंदू १५ किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने एक्स पोस्ट करत दिली आहे. या भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी  तुर्तास यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. (Afghanistan Earthquake)

काल अफगाणिस्तानात ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप

यापूर्वी काल (दि.१७) मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी अफगाणिस्तानच्या दक्षिणेला भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू ४५ किमी खोलीवर होता. तर त्याहीआधी अफगाणिस्तानजवळच असलेल्या तजाकिस्तानमध्ये १३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू हा २८ किमी खोलीवर होता, अशी माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. (Afghanistan Earthquake)

हेही वाचा:

Back to top button