

अबुधाबी : वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांच्या यूएई (संयुक्त अरब अमिरात) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी १४ फेब्रुवारी रोजी राजधानी अबुधाबीलगत या मुस्लिम देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. मंगळवारी यूएई अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठक झाली. 'अहलान मोदी' (नमस्कार मोदी) हा कार्यक्रम झाला. यूएईमधील मूळ भारतीयांना मोदींनी मार्गदर्शन केले. (PM Modi UAE Hindu Mandir Inauguration)