Elon Musk : मंगळावर १० लाख लोकांना वसविणार; अ‍ॅलन मस्क यांनी जाहीर केले धडाकेबाज नियोजन

Elon Musk : मंगळावर १० लाख लोकांना वसविणार; अ‍ॅलन मस्क यांनी जाहीर केले धडाकेबाज नियोजन

पॅरिस; वृत्तसंस्था : मंगळावर पहिल्याच प्रयत्नात व एकाच वेळी पृथ्वीवरील 10 लाख लोकांना वसविण्याचे धडाकेबाज नियोजन स्पेसएक्सचे संचालक अ‍ॅलन मस्क यांनी जाहीर केले. या नवोदित मंगळवासीयांच्या पाणी ते प्राणवायू अशा सर्व गरजा मंगळावरच पूर्ण होतील. पृथ्वीवरून काहीही वेगळे पुरवावे लागणार नाही, असे अकल्पनीय संकेतही मस्क यांनी दिले.

पॅरिस येथे आयोजित एका तंत्रज्ञान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना मस्क यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.
मंगळावर मानवाच्या अस्तित्वासाठीची इकॉलॉजिकल सिस्टीम उभारली जाईल. लोक आपल्या कुटुंबासह तेथे मजेत जगू शकतील, असेही मस्क म्हणाले.

हे सगळे लवकरच घडेल, असे मस्क यांनी सांगितलंय खरं; पण त्यासाठीची तारीखनिहाय कार्यक्रम पत्रिका काही जगाच्या पुढ्यात ठेवलेली नाही. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मस्क लिहितात, 10 लाख लोकांना एकाचवेळी मंगळावर वसविण्याचा आमचा कृती आराखडा तयार आहे. मंगळावर या सगळ्यांसाठी ते सगळे असेल, जे पृथ्वीवर उपलब्ध आहे. अर्थात प्रारंभिक काळात पृथ्वीकडून मदत पुरविली जाईल, पाठबळ दिले जाईल. पण पुढे लवकरच एक वेळ अशी आलेली असेल, की पृथ्वीवरून मंगळावर काहीही आले नाही तरी या मंगळवासीयांचे काही बिघडणार नाही. एकदा वस्ती झाली, की पुढे लवकरच ते प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर झालेले असतील, अशी ग्वाहीही मस्क यांनी या पोस्टमधून दिलेली आहे.

 जे घडेल ते 8 वर्षांनंतरच…

मस्क हे स्पेसएक्सचेही संस्थापक आहेत. स्पेसएक्सकडून पृथ्वीवासीयांसाठी चांद्रसफर हा उपक्रम येत्या 8 वर्षांत सुरू झालेला असेल, असे मस्क यांनी गेल्या आठवड्यातच सांगितले होते. अन्य ग्रहांवरील सफरीसाठी चंद्रावर तळ असेल, असेही मस्क यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. मंगळावरील या प्रकल्पासाठी चंद्रावर तळ आवश्यक आहे. म्हणजे आठ वर्षांनंतरच मंगळावरील मानवी वस्तीबद्दल नेमके काही सांगता येईल, असा कयास अंतराळ विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातून लावला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news