पाकमध्‍ये शरीफ-भुट्टो यांचे आघाडी सरकार स्‍थापण्‍याचे संकेत, इम्रान खान समर्थक आक्रमक | पुढारी

पाकमध्‍ये शरीफ-भुट्टो यांचे आघाडी सरकार स्‍थापण्‍याचे संकेत, इम्रान खान समर्थक आक्रमक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तान राष्ट्रीय संसद आणि प्रांतीय विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नसल्‍याने सत्तासंघर्षाचा तिढा कायम राहिला आहे. इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी 93 जागांसह आघाडी घेतली आहे. नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) (पीएमएलएन) 75 जागांसह दुसर्‍या स्थानी, तर बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) 54 जागा जिंकून तिसर्‍या स्थानी आहे. दरम्‍यान,  नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्यात सरकार स्‍थापन करण्‍यासाठी आघाडी करण्याची चर्चा सुरू आहे. आज ( दि.१२) शरीफ-भुट्टो आघाडीवरचे चित्र स्‍पष्‍ट होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. देशाला राजकीय देशाला राजकीय अस्थिरतेपासून वाचवण्यासाठी आघाडी सरकार स्‍थापन्‍यास दोन्‍ही पक्षांनी तत्वतः सहमती दर्शविल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( Nawaz Sharif, Bilawal Bhutto alliance likely )

अपक्षांचे समर्थन मिळविण्‍यासाठी शरीफ-भुट्टो सरसावले

सहा अपक्ष उमेदवार नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) (पीएमएलएन) मध्‍ये सहभागी होणार असलर्‍याचे जाहीर केले आहे. इम्रान खान यांच्‍या पक्षाला सत्ता स्‍थापने एवढे संख्‍याबळ नसल्‍याने हा निर्णय घेतला असल्‍याचे या उमेदवारी जाहीर केले आहे. नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष अपक्ष उमेदवारांना आपल्‍याकडे घेण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत. आतापर्यंत, लाहोरमधील इम्रान खान यांच्‍या पीटीआय पक्षाचे समर्थित विजयी उमेदवार वसीम कादिर यांच्‍यासह सहा अपक्ष निवडून आलेले उमदेवार ‘पीएमएलएन’मध्‍ये सहभागी झाले आहेत. मी माझ्‍या घरी परतलो आहे, माध्‍यमांशी बोलताना वसीम कादिर यांनी सांगितले.

शरीफ-भुट्टो यांचे राजकीय सहकार्यांवर तत्त्वत: एकमत

पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात राजकीय सहकार्यावर तत्त्वत: एकमत झाले. बैठकीत देशाची एकूण परिस्थिती आणि भविष्यातील राजकीय सहकार्य यावर सविस्तर चर्चा झाली. नेत्यांनी राजकीयदृष्ट्या सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली. देशाला राजकीय स्थैर्य प्राप्त होईल, असे नवाझ शरीफ यांच्या पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे.

कराचीतील ‘एमक्‍यूएम’ची शरीफांशी चर्चा

कराचीमधील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्‍यूएम) पक्षानेही यंदाच्‍या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली. या पक्षाच्‍या १७ उमेदवारांचा विजय झाला आहे. सत्ता स्‍थापनेसाठी या पक्षाने नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे. या पक्षाचा निर्णयही पाकिस्तानातील पुढील सरकारचे भवितव्य ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाकिस्‍तान राष्ट्रीय संसदेमध्‍ये ( नॅशनल असेंब्ली ) बहुमत सिद्‍ध करण्‍यासाठी १६९ संख्‍याबळ आवश्‍यक आहे.

शरीफ यांचा पक्ष पंतप्रधानपदासाठी आग्रही

पाकिस्‍तानमधील ‘द डॉन’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, मागील पीएमएल-एन आणि पीडीएम युती सरकारप्रमाणेच पंतप्रधानपद हे शरीफ यांच्‍या पक्षाला तर पीपीपी पक्षाला अध्‍यक्षपद, संसदेचे सभापती आणि सिनेट चेअरमनपदाची ऑफर देण्‍यात आली आहे. आज सरकारमधील पद वाटपावर चर्चा होणार आहे.

इम्रान खान समर्थक आक्रमक

इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी 93 जागांसह आघाडी घेतली आहे. मतमोजणीमध्‍ये घोटाळा झाल्‍याचा आरोप इम्रान खान समर्थक करत आहेत. तसेच रविवारी समर्थकांनी रस्‍त्‍यावर उतरत देशातील लष्‍करशाहीचा निषेध केला. इम्रान खान यांनी सर्व सर्मथकांना शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करण्‍याचे आवाहन केले आहे. दरम्‍यान, “पीटीआय’चे नेते शफकत महमूद यांनी म्हटले आहे की, पूर्वीच्या पीएमएल-एन-नेतृत्वाप्रमाणेच आणखी एक युती सरकार शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील थट्टा करत आहे”.

Back to top button